अंधारीत कानिफनाथ महाराज उर्फ शाह रमजान मिया यात्रा उद्यापासून प्रारंभ
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
अंधारी: सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथिल सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले ग्रामदैवत कानिफनाथ महाराज उर्फ शाह रमजान मिया यांच्या यात्रा महोत्सवास दरवर्षीप्रमाणे शनिवारी (दि.१२)पासुन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.या यात्रा महोत्सवानिमित्त संपूर्णत अंधारी गाव गजबले असुन यात्रेत राहाट पाळणे मनोरंजनाचे विविध स्टाॅल सजली आहे.याञेची सुरुवात शनिवारी राञी श्रींची विशाल संदल मिरवणुक काढण्यात येणार आहे संदल मिरवणुकीत ड़फ.वाध्याचा सामना तसेच बॅड़ पथकांचा मुकाबला तर नगार्याची जुगलबंदी तर तगतरावचा रंगीत संगीत अशी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत रविवारी (दि.१३) कानीफनाथ महाराज ऊर्फ शाहरमजान मियाॅ यांच्या याञा महोत्सव होणार आहे सोमवारी (दि १४) जंगी कुस्ताचा आखाडा ठेवण्यात आला आहे.या ठीकाणी एक रुपया पासुन ते हजारो रुपयांपर्यंत कुस्त्यांचे आखाडे होणार आहे तसेच या ठिकाणी जिल्हाभरातून पैलवान कुस्ती खेळण्यासाठी दाखल होतात.अंधारी गावापासून तिन किलोमीटर डोंगर दरीच्या टेकडीवर कानिफनाथ महाराज उफ॔ शाहरमजान मियाॅ मंदीर वसलेले असून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेले कानिफनाथ महाराज उर्फ शाहरमजान मियाॅ यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे या यात्रा महोत्सवास अंधारी गावातील लेकीबाळी माहेरी येतात व पाहुणे आपल्या मुलाबाळांसह श्रींच्या संदल मिरवणुकीत व दर्शनासाठी तर बाहेर गावी नोकरीसाठी गेलेले ग्रामस्थ भाविक याञेसाठी मोठ्या प्रमाणावर येतात व श्रींरीच्या संदल मिरवणुकी चा आनंद घेतात याची प्रचीती दुरवर पसरलेली आहे भावीकांच्या गर्दीत वाढ होत आहे तरी जिल्हाभरातील भाविक भक्तांनी या यात्रा महोत्सवास अवश्य लाभ घेण्याचे आवाहन पंच समितीतर्फे करण्यात आले आहे.
अंधारी: सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक कानिफनाथ महाराज ऊर्फ शहा रमजान मिया डोंगर टेकडीच्या सान्निध्यात असलेले भव्य मंदिर (छायाचित्र : दीपक सिरसाठ)