September 23, 2024

आज औरंगाबाद जिल्ह्यात 45 रुग्णांची वाढ, एकूण रुग्ण संख्या 2065 वर

0
Contact News Publisher

आज औरंगाबाद जिल्ह्यात 45 रुग्णांची वाढ, एकूण रुग्ण संख्या 2065 वर

*जिल्ह्यात 737 रुग्णांवर उपचार सुरू, आज 45 रुग्णांची वाढ*

औरंगाबाद, दि.08 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 45 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2065 झाली आहे. यापैकी 1224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 104 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 737 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शिवशंकर कॉलनी (1), बौद्ध नगर (1), पीर बाजार, उस्मानपुरा (8), पोलिस क्वार्टर, तिसगाव (1), भोईवाडा, मिलकॉर्नर (1), सातारा परिसर (3), पद्मपुरा (1), फाजीलपुरा, मोहनलाल नगर (1), सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), मजनू हिल, दमडी मोहल्ला (1), ज्युबली पार्क (1), गारखेडा परिसर (1), चिकलठाणा (2), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर (5), सादाफ कॉलनी, कटकट गेट (2), पुंडलिक नगर (1), विद्या निकेतन कॉलनी (2), भोईवाडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), सेंट्रल नाका, बायजीपुरा (1),एन-चार, सिडको (1), कैलास नगर (1), गणेश नगर, पंढरपूर परिसर (1), अन्य (2), देवशी पिंपळगाव, गंगापूर (1), सावरखेडा, सोयगाव (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 18 महिला आणि 27 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
*****

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending