September 23, 2024

खुलताबादेत बंदोबस्ताला दांडी मारणे भोवले; औरंगाबाद ग्रामीणचे 14 पोलिस निलंबित!

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

औरंगाबाद : शनि अमावास्यानिमित्त खुलताबाद येथे बंदोबस्ताला दांडी मारणाऱ्या 14 पोलिसांना पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून कामचुकारपणा करणाऱ्या पोलिसांवर त्यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. (14 police suspended Aurangabad Rural Absence security Khultabad)

सफौ अशोक रघुनाथ नेवे, सफौ देविदास साहेबराव साळवे, पोह व्ही. व्ही. चौधरी, पोना दिनेश परदेशी, पोना दत्तात्रय लोटन सौंदाने, पोशि आर. एस. राख, मपोह सुनिता अशोक लखमाल, मपोह संगीता जाधव, मपोह एस. जी. घुगे, मपोह कांचन हरीश्चंद्र शेळके, मपोशि मुक्ता एकनाथ कातकडे, मपोशि शालीनी चव्हाण, मपोशि द्रॉपती सीताराम जाधव, मपोशि सुवर्णा एकनाथ मुंजाळ अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.  (14 police suspended Aurangabad Rural Absence security Khultabad)

खुलताबाद येथील भद्रामारूती देवस्थान संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. शनि अमावास्या आणि कोरोनाचे उठवलेले निर्बंध यामुळे लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून तगडा बंदोबस्त नियोजित केला होता. यासाठी बंदोबस्त कामी पोलीस मुख्यालय येथून 20 पोलीस अंमलदार पाठवण्याचे आदेश काढण्यात आले होते. पोलीस मुख्यालय औरंगाबाद (ग्रामीण) येथून शनि आमवस्या बंदोबस्त कामी 20 पोलीस अंमलदार हे लाठी हेल्मेटसह पो.स्टे खुलताबाद औरंगाबाद ग्रामीण येथे दि . 29/04/2022 रोजी 12.00 वाजता रिपोर्ट करतील या बेताने पाठविण्याचे आदेश काढण्यात आले होते. (14 police suspended Aurangabad Rural Absence security Khultabad)

20 जणांमध्ये सफौ अशोक रघुनाथ नेवे, सफौ देविदास साहेबराव साळवे, सफौ किसन मोतीराम जोगदंडे, पोह व्ही. व्ही. चौधरी, पोह के.एच. पचलोरे, पोना आशिष जमदाडे, पोना दिनेश परदेशी, पोना दत्तात्रय लोटन सौंदाने, पोशि एस. एम. खुरमुटे, पोशि रामेश्वर चेळेकर, पोशि अतुल बंकटराव गिते, पोशि आर. एस. राख, मपोह सुनिता अशोक लखमाल, मपोह संगीता जाधव, मपोह एस. जी. घुगे, मपोह कांचन हरीश्चंद्र शेळके, मपोशि मुक्ता एकनाथ कातकडे, मपोशि शालीनी चव्हाण, मपोशि द्रॉपती सीताराम जाधव, मपोशि सुवर्णा एकनाथ मुंजाळ यांचा समावेश होता.  (14 police suspended Aurangabad Rural Absence security Khultabad)

मात्र, या 20 पोलिसांपैकी 14 जण वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता बंदोबस्ताला गैरहजर राहिले. याची गंभीर दखल पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी घेतली आहे. त्यामुळे 14 पोलिसांना त्यांनी निलंबित केले. निलंबन काळातील लाभ त्यांना मिळणार असून पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. याशिवाय खाजगी नौकरी किंवा व्यापारही त्यांना करता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे औरंगाबादच्या पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending