September 23, 2024

बेजबाबदार वैधकीय अधिकारी डॉ.तुपे, डॉ.पाटील वर कार्यवाहिस विलंब; जिल्हा आरोग्य अधिकारीची भूमिका संशयास्पद

0
Contact News Publisher

वैधकीय अधिकारी डॉ.तुपेचा शिवीगाळ करतांना व्हिडीओ व्हायरल तर डॉ.पाटील सतत रजेवर तरी पगार खात्यावर!

गदाना आरोग्य केंद्रातील दोन्ही वैधकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणे अपेक्षित असतांना दुर्लक्ष का!

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

बाजार सावंगी आरोग्य केंद्रातील बेजबाबदार वैधकीय अधिकारी श्रीकांत तुपे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक दिली तर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पदाधिकारी यांना दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे याप्रकरणी आरोग्य विभागातील मुजोर वैधकीय अधिकारी डॉ.श्रीकांत तुपेवर कार्यवाहीची मागणी मा.उपसभापती प्रभाकर सिंदे व संदीप निकम यांनी केली आहेत.

विशेष म्हणजे बाजार सावंगी आरोग्य केंद्रात एकूण दोन वैधकीय अधिकारी पद आहेत मात्र मागच्या दोन महिन्यांपासून येथील एक वैधकीय अधिकारी यांना गदाना आरोग्य केंद्राचा पदभार सांभाळण्याचे आदेश दिले आहेत.

गदाना आरोग्य केंद्रातील दोन्ही वैधकीय अधिकारी सतत गैरहजर व रजेवर

गदाना आरोग्य केंद्रात एकूण दोन वैधकीय अधिकारी आहेत मात्र दोन्ही वैधकीय अधिकारी वर्षभपासून सतत गैरहजर व रजेवर असतात त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके यांनी बाजार सावंगी येथील एक वैधकीय अधिकारीला गदाना आरोग्य केंद्राचे काम सांभाळण्याचे आदेश दिले आहेत

गदाना आरोग्य केंद्रातील दोन्ही वैधकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणे अपेक्षित असतांना दुर्लक्ष का!

गदाना आरोग्य केंद्रातील दोन्ही वैधकीय अधिकारी सतत गैरहजर व रजेवर असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित असतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी तसे ना करता त्यांना वारंवार सवलत देत असल्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दूरध्वनीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सर्व घटना सांगून व व्हिडीओ पाठवून सर्व हकीकत सांगितली मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असतांना प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत अशी नाराजी निकम यांनी व्यक्त केली आहे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending