September 22, 2024

औरंगाबाद तापणार : ‘आ रहा हूं मैं’, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी १२ मे रोजी शहरात

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम

औरंगाबाद : राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, तसेच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चर्चेत असताना आता आणखी एक दौरा आता गाजू लागला आहे. कारण १२ मे रोजी एमआयएमचे वादग्रस्त नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबाद शहरात येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेनंतर पुन्हा एकदा औरंगाबाद शहराचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
अकबरुद्दीन यापुर्वीच औरंगाबादेत येणार होते, मात्र तेव्हा त्यांचा दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आला होता. आता १२ रोजी त्यांच्या हस्ते `नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनल`, संस्थेची पायाभरणी केली जाणार आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. आ रहा हूं औरंगाबाद, असे म्हणत इम्तियाज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे, एमआयएमचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि संस्थापक अध्यक्ष सालार-ए-मिल्लत एज्युकेशनल ट्रस्ट, हबीब-ए-मिल्लत जनाब अलहाज अकबरुद्दीन ओवेसी साहेब `नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनल` च्या पायाभरणीसाठी औरंगाबाद येथे येणार आहेत.

कॅम्पस (ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची शाखा, औरंगाबाद) हिमायतबागच्या मागे १२ मे २०२२ रोजी दुपारी चार वाजता वंचित मुलांसाठी उभारण्यात येणाऱ्या शाळेचे भूमीपुजन अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शाळेत गरीबांच्या मुलांना पुर्णपणे मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हैदराबादमध्ये अशा प्रकारच्या ११ शाळा अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावतीने चालवल्या जातात. हैदराबाद येथील सर्व शाळांचा खर्च ते स्वतः उचलतात. शैक्षणिक आणि धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून या शाळांचे व्यवस्थापन केले जाते. हजारो मुली आणि महिलांना येथे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासोबतच हजारो मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची महाराष्ट्रातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये स्थापन होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending