खुलताबाद- खाकसार तलावाचा कायापालट होणार!; ७५ लाखांचा निधी मंजूर
सरपंच सय्यद इलियास यांच्या प्रयत्नाला यश!
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत सुलीभंजन येथील पुरातन खाकसार तलाव दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी ७५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे, तर तलावाच्या दुरुस्ती कामाचे सोमवारी सरपंच सय्यद इलियास यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
सुलीभंजन गावालगत खाकसार तलाव असून, चार दशकांपूर्वी येथून खुलताबादला पाणीपुरवठा करण्यात येत होता. गत ५० वर्षांपासून या तलावाची देखभाल दुरुस्ती केली गेली नाही. त्यामुळे पाणीसाठा होण्यास अडचणी निर्माण होत आहे. सद्यस्थितीत सुलीभंजन गावास पाणीपुरवठा केला जात असला, तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत या तलावाच्या दुरुस्तीसाठी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला. सरपंच सय्यद इलियास यांच्या हस्ते सोमवारी कामाचा शुभारंभ झाला. यावेळी प्रादेशिक जलसंवर्धन अधिकारी व्ही. बी. गालफडे, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी सूरज शिंदे, उपअभियंता दीपक लांडगे, सुरभी वर्मा, वैभव चव्हाण, माजी सरपंच द्वारकादास घोडके, उपसरपंच रूपाली घोडके, द्वारकाबाई निकाळजे, योगीता वाघ, घुसळे, विकास आदी उपस्थित होते.