September 22, 2024

ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याप्रकरणी रवीना टंडनची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “भारत हा एक…”

0
Contact News Publisher

रवीना टंडनने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

  • क्राईम टाईम्स डिजिटल टीम

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आता बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये रवीना म्हणाली की,”माझ्या जन्मभूमीला “असहिष्णु’ असे लेबल लावणे ही काही काळापूर्वीच एक फॅशन बनली आहे. यावरून आपण किती सहनशील आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होते. हे एक उदाहरण आहे. असहिष्णुता आहे कुठे?”

दरम्यान, या आधी रवीनाने लेखर आनंद रंगनाथन यांचे ट्वीट शेअर करत म्हणाली, “आम्ही सहनशील आहोत, होतो आणि राहू. भारत हा एक स्वतंत्र देश आहे, इथे कोणालाही कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत.”

काय आहे हे प्रकरण?

लेखक आनंद रंगनाथन यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी गेलेल्या एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत ते म्हणाले, “गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद करणाऱ्या, संभाजी महाराजांचा शिरच्छेद करणाऱ्या, काशीला उद्ध्वस्त करणाऱ्या आणि ४.९ दशलक्ष हिंदूंची हत्या करणाऱ्या राक्षसाच्या कबरीवर प्रार्थना करणे हे चिथावणी देणारे मनोरुग्ण कृत्य आहे.”

रवीना टंडन अलीकडेच ‘KGF: Chapter 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. हा चित्रपट अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. KGF 2 ने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले आणि सध्याच्या काळातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘KGF 2’ आता १२०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending