September 21, 2024

नाविन्यपूर्ण योजना: ५०%अनुदान शेड, १० शेळ्या, २ बोकड, गट वाटप योजना

0
Contact News Publisher

Shelipalan Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठवाडा १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना शासन निर्णय माहिती या लेखात पाहणार आहोत. १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना राबविण्यास मान्यता दिलेले जिल्हे मराठवाडाच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये १० शेळ्या आणि २ बोकड असा शेळी गट वाटप योजना करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती.
पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटप राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची किंवा मेंढ्या आणि नर मेंढ्यांची आधारभूत किंमत वाढवण्यास १२ मे २०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने प्रदान केलेली आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती

शरद पवार ग्रामसमृद्धी शेळीपालन शेड अनुदान योजना माहिती

1 १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना शासन निर्णय

1.1 नवी मंजुरी शेळी-मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती

1.2 शेळी गट वाटप योजनेचा तपशील –


१० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना शासन निर्णय

१० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्याला शेळी आणि बोकड गट वाटप करणे. प्रास्ताविक असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळ्यांसाठीचा वाडा) यासाठी रुपये २,३१,४००/- (अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) इतका आहे. या योजनेअंतर्गत गटाची स्थापना करताना लाभार्त्याला सुरुवातीला शंभर टक्के निधी स्वतः किंवा वित्तीय संस्थेचे म्हणजेच बँकेचे कर्ज याद्वारे उभा करावा लागणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान (सबसिडी) देय राहील. तथापि प्रति गट कमीत कमी रुपये १,१५,७००/- याप्रमाणे अनुदान (सबसिडी) देय राहील.

ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता

शेळी गट वाटप योजनेचा तपशील –

या योजनेअंतर्गत २० शेळ्या खरेदीसाठी दर प्रति शेळी ६,०००/- रुपये असणार आहे. या गटाची २० शेळी गटाची अपेक्षित एकूण किंमत १ लाख २० हजार एवढी असणार आहे.

दोन बोकड खरेदी करण्यासाठी प्रति बोकड दर हा ८,०००/- रुपये असणार आहे. बोकड गटाची एकूण किंमत १६,०००/- रुपये असणार आहे.

शेळ्यांचा वाडा बांधण्यासाठी ४५० चौरस फूटाचा असून प्रति शेळी किंवा बोकड २१२ रुपये प्रति चौरस फूट या दराने एकूण शेळ्यांच्या वाडा बांधण्याची किंमत ९५,४००/- एवढी असणार आहे.

असे २० शेळ्या, २ बोकड आणि शेळ्यांचा वाडा यांची होणारी एकूण खर्च करावयाची रक्कम २,३१,४००/- ( अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) एवढी असणार आहे.

एकूण शेळी गट बोकड आणि शेळ्यांच्या वाड्यांचा किमतीच्या ५० टक्के म्हणजेच २,३१,४५०/- (अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) च्या ५० टक्के १,१५,७००/- (अक्षरी रुपये एक लाख पंधरा हजार सातशे) एवढे अनुदान देय असेल.

प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन आवेदन फॉर्म: PMAY के लिए ऑनलाइन और ऑफलाइन कैसे आवेदन करें

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending