September 21, 2024

एक शेतकरी एक डीपी योजना 2022 ऑनलाइन अर्ज

0
Contact News Publisher

शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे मुख्य उद्दिष्ट 

  • क्राईम टाईम्स टीम

Ak Shetkari Ak DP Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक शेतकरी एक डीपी 2022 यांसंबंधीच्या सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, योजनेचे लाभ कोणते आहेत, अर्ज कुठे व कसा करायचा, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हे अर्ज सध्या चालू आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करू शकता . आणि तुमच्या स्वतःच्या शेतकत डीपी बसवू शकता.

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती

1 one farmer one transformer scheme 2022 in maharashtra

1.1 शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे मुख्य उद्दिष्ट –

1.2 एक शेतकरी एक योजनेचे फायदे –

1.3 एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –

1.4 Important Links –

1.5 हेल्पलाईन नंबर –

1.6 Related

–one farmer one transformer scheme 2022 in maharashtra

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता होती. तसेच १४ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.

ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता

शेतकरी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे मुख्य उद्दिष्ट 

  • लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
  • विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
  • तांत्रिक वीज हानी वाढणे
  • रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
  • विद्युत अपघात
  • लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.

अश्या प्रकारच्या गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, अनधिकृत वीज जोडणी होणार नाही.

 

एक शेतकरी एक योजनेचे फायदे –

  • ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.
  • अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक खाते क्रमांक

–Important Links –

अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English

ऑफिसिअल वेबसाइट – mahadiscom.in

–हेल्पलाईन नंबर –

शेतकरी मित्रांनो जर आणखीही तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
१८००-२३३-३४३५

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत योजनेअंतर्गत सन २०२१-२२ वर्षासाठी शासन अनुदान

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending