September 21, 2024

खासदार इम्तियाज जलील यांच्या दुआ फाऊंडेशन अंतर्गत ‘जॉब अलर्टस्’ योजनेत रोजगारासाठी पुन्हा नाव नोंदणीला सुरुवात

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील संचलित दुआ फाऊंडेशन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व समाजातील, सर्व स्तरातील, विविध कौशल्य आणि शैक्षणिक अहर्ता प्राप्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा या करिता *”Job Alerts”* ही योजना सुरू करण्यात आली होती.
*Job Alerts* योजनेशी जोडले जाण्यासाठी *9172100116* हा व्हॉटसअ‍ॅप क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये *Save* करून त्यावर *Join Job Alerts* व *आपले नाव टाईप करुन* मॅसेज पाठविल्यास *फॉर्मची लींक* आपल्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर उपलब्ध होईल, फॉर्ममध्ये दिलेली माहिती योग्यरित्या भरुन फॉर्मच्या शेवटी दिलेल्या *Submit* बटन वर क्लिक करावे असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यानी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन आवेदन फॉर्म: PMAY के लिए ऑनलाइन और ऑफलाइन कैसे आवेदन करें

यापूर्वी नोकरीसाठी नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जॉब अलर्ट्स तर्फे औरंगाबाद शहरात *सहा यशस्वी रोजगार मेळावे* घेण्यात आले होते. मेळाव्यात नोकरी देण्यासाठी विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये शेकडो उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अहर्ता व कौशल्यानुसार नोकरी उपलब्ध करून देण्यात आली होती.

खासगी जॉब- जिओ मार्ट  कस्टमर सर्व्हिस ऑफिसर पाहिजेत

सदरील योजनेत नाव नोंदणी करणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार व किमान कौशल्यानुसार शासकीय व निमशासकीय तसेच खासगी नोकऱ्यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती तसेच कौशल्य प्रशिक्षण आणि विविध शासकीय लोकाभिमुख योजनांची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध करुन देण्यात येईल. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापना व कंपन्यांना मध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीत *’जॉब अलर्टस्’* योजनेत नाव नोंदणी करणाऱ्यां युवक-युवतींना प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यानी केले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील वेगवेगळ्या उद्योग समूहांशी संपर्क करून ‘जॉब फेअर’ आणि ‘कँम्पस इंटरव्यु’ सारख्या संकल्पना राबवून युवक-युवतींना जास्तीत जास्त रोजगार कसा प्राप्त होईल यासाठी जॉब अलर्टस् च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. तसेच नौकरी मिळावी म्हणून मुलाखत, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, मराठी संवाद व विविध क्षेत्रातील मार्गदर्शन अशा विविध बाबींमध्ये पारंगत करण्यासाठी तज्ञांकडून मोफत प्रशिक्षण (सेमिनार) दिले जाईल. तसेच स्वयंरोजगारासाठी शासनांच्या विविध योजनांची माहिती सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी दिली आहे.

ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending