September 21, 2024

संकरित दुधाळ गाई /म्हशी चे वाटप योजना २०२२ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती

0
Contact News Publisher

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेसंदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची कार्यप्रद्धती, कोणत्या जिल्ह्यांसाठी हि योजना राबवली जाणार आहे

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

मुबंई: नमस्कार मित्रांनो, आज आपण दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेसंदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेची कार्यप्रद्धती, कोणत्या जिल्ह्यांसाठी हि योजना राबवली जाणार आहे, शासन निर्णय, या योजनेसाठी प्रकल्प किंमत, लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टींची माहिती या लेखात तुम्हाला आज मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
या योजनेअंतर्गत महिला बचत गट, अल्पभूधारक शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना या योजनेत चा प्राधान्याने लाभ घेण्यात येणार आहे घेता येणार आहे. ही योजना राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत संकरित आणि देशी गाई यांचे वाटप करण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती

–६/४/२ दुधाळ गाई /म्हशी चे वाटप

संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप :

सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता

–लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम

महिला बचत गट

अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )

सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )

1संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००2जनावरांसाठी गोठा०3स्वयंचलित चारा कटाई यंत्र०4खाद्य साठविण्यासाठी शेड०5५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१एकूण प्रकल्प किंमत८५,०६१

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५

  • टक्के =६३,७९६1स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५
  • टक्के=२१२६५. ३३2शासकीय अनुदान सर्वसाधारण ५०
  • टक्के =४२,५३१2स्वहिस्सा सर्वसाधारण ५०
  • टक्के  =४२,५३१

एक शेतकरी एक डीपी योजना 2022 ऑनलाइन अर्ज

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  • सातबारा (अनिवार्य)
  • ८ अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य )
  • ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ची कार्यपद्धती काय आहे?

  • अर्जदाराला सर्वप्रथम महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी लागेल.
  • यानंतर दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • मिळालेल्या अर्जामधून स्क्रुटीनी किंवा प्राथमिक निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करण्यात येतील.
  • यानंतर अंतिम निवड केली जाईल.

राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत योजनेअंतर्गत सन २०२१-२२ वर्षासाठी शासन अनुदान

दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप अर्ज कुठे करावा?

दुधाळ गाई म्हशी वाटप अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर म्हणजेच ah.mahabms.com वर स्वीकारले जातात.

शासन निर्णय दुधाळ किंवा म्हशींचे गट वाटप योजना

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ६/४/२ दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत सदर योजनेस दिनांक ३० ऑक्टोबर २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ६/४/२ संकरित गाई किंवा म्हशींचे गट वाटप करणे या नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत दिनांक १९ जानेवारी २०१९ रोजी मंजुरी देण्यात आली.

या शासन निर्णयानुसार राज्यात दुग्धोत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत वाटप करावयाच्या ६/४/२ संकरित गाई किंवा मशीनचे वाटप या योजनेमध्ये दुधाळ गाईंच्या यामध्ये गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी ,थारपारकर ,देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

खासगी जॉब- जिओ मार्ट  कस्टमर सर्व्हिस ऑफिसर पाहिजेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending