September 21, 2024

अंधारी रस्त्यांवरील पूल अरुंद असल्यामुळे पुलावर चार तास वाहतूक खोळंबली

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

अंधारी : सिल्लोड तालुक्यातील
अंधारी, परिसरात सलग तिसर्या दिवशी विजेच्या कडकडाटात कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.तब्बल तिन तास चाललेल्या जोरदार पावसामुळे येथील सोमवारच्या आठवडी बाजारात एकच दाणादाण उडाली पावसासह जोरदार हवा असल्यामुळे व्यापाऱ्यांनी लावलेले पाल अक्षरश उखडून पडले याशिवाय अंधारी आळंद रस्त्यावरील जातवा जवळील इसाक मौलाना यांच्या शेताजवळील पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे पूल छोटा असल्याकारणाने जवळपास साडेचार तास तास वाहतूक खोळंबली होती.तसेच अंधारी येथील मुख्य भोरर्डी नदी असलेली या पावसाळ्यात प्रथमच रौद्ररूप धारण केलेली दिसून आली.याशिवाय सखल भागात रस्त्यावर पाणी तुंबल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली .

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

छायाचित्र ओळ
अंधारी :सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात सोमवारी तीन च्या सुमारास पडलेल्या जोरदार येथील भोरर्डी नदीने रौद्ररूप धारण केले .
दुसऱ्या छायाचित्रात बाजारात येणार्या शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली
तिसऱया छायाचित्रात सोमवारच्या आठवडी बाजारात पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे झालेली अवस्था

एक शेतकरी एक डीपी योजना 2022 ऑनलाइन अर्ज

चौथ्या छायाचित्रात आळंद अंधारी रस्त्यावरील मौलाना यांच्या शेताजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे जवळपास चार तास वाहतूक खोळंबली सायंकाळी आठ वाजले तरीही वाहतूक सुरळीत झाली नाहीत
(सर्व छायाचित्रे दीपक सिरसाठ )*

पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी 2022 महाराष्ट्र :अर्ज, कागदपत्रे, पात्रता माहिती

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending