September 21, 2024

६२ तालुक्यांमधील २७१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ऑगस्टमध्ये; औरंगाबाद जिल्ह्यातील..

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

मुंबई :- राज्यात एका बाजूला सत्तासंघर्ष सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) सक्रिय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आयोगाने राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशन पत्रे १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुटीमुळे १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी २० जुलै २०२२ रोजी होईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

संकरित दुधाळ गाई /म्हशी चे वाटप योजना २०२२ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या

नाशिक : बागलाण- १३, निफाड- १, सिन्नर- २, येवला- ४, चांदवड- १, देवळा- १३ आणि नांदगाव- ६. धुळे : धुळे- २, साक्री- ४९ आणि शिंदखेडा- १. जळगाव : रावेर- १२, अमळनेर- १, एरंडोल- २, पारोळा- ३ आणि चाळीसगाव- ६. अहमदनगर : अहमदनगर- ३, श्रीगोंदा- २, कर्जत- ३, शेवगाव- १, राहुरी- ३ आणि संगमनेर- ३. पुणे : हवेली- ५, शिरुर- ६, बारामती- २, इंदापूर- ४ आणि पुरंदर- २. सोलापूर : सोलापूर- २, बार्शी- २, अक्कलकोट- ३, मोहोळ- १, माढा- २, करमाळा- ८, पंढरपूर- २, माळशिरस- १ आणि मंगळवेढा- ४. सातारा : कराड- ९ आणि फलटण- १. सांगली : तासगाव- १. औरंगाबाद : औरंगाबाद- १, पैठण- ७, गंगापूर- २, वैजापूर- २, खुलताबाद- १, सिल्लोड- ३, जालना- ६, परतूर- १, बदनापूर- १९ आणि मंठा- २. बीड : बीड- ३, गेवराई- ५ आणि अंबेजोगाई- ५. लातूर : रेणापूर- ४, देवणी- १ आणि शिरूर अनंतपाळ- ४. उस्मानाबाद : तुळजापूर- २, कळंब- १, उमरगा- ५, लोहारा- २ आणि वाशी- १. परभणी : सेलू- ३. बुलढाणा : खामगाव- २ आणि मलकापूर- ३. एकूण- २७१.

ऑनलाईन फॉर्म सुरू 25 लाखापर्यंत अनुदान शेळी, मेंढी, कुकुटपालन करता

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending