September 21, 2024

डॉ.मजहर खान यांना डॉ. शंकररावजी चव्हाण गुरुरत्न पुरस्कार जाहीर

0
Contact News Publisher

डॉ.मजहर खान यांचा खुलताबादेत विविध ठिकाणी सत्कार

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

दरवर्षी देण्यात येणारा डॉ. शंकररावजी चव्हाण गुरुरत्न पुरस्कार जाहीर झाला असून यात औरंगाबादचे डॉ. मजहर खान यांच्यासह नऊ रत्नांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून दि. १३ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मीमांसा फाउंडेशन, व्हाईस ऑफ मिडिया, समीक्षा, मंथन क्रीएटीव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व ह्युमन राईटस फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी माजी गृहमंत्री भारत सरकार, पाणीदार नेतृत्व, मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यातीलच नव्हे तर देशातील नामवंत व्यक्तिमत्वाच्या डॉ. शंकररावजी चव्हाण गुरुरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जातो. यंदाचे हे चवदावे वर्ष आहे.

खुलताबाद येथे कोहिनूर शिक्षण संस्था मार्फत गरजूंना मदत करून सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची संधी प्रदान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मजहर खान यांना जाहीर करण्यात आला आहे. या निमित्ताने कोहिनूर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य. डॉ. मधुकर हिवाळे व प्राध्यापिका कमरुनिस्सा बेगम, यांनी डॉ. मजहर खान साहेबांचा सत्कार केला. याप्रसंगी आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मकसूद खान साहेब व महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शेख मोहमद आरिफ, डॉ. सय्यद अब्दुल अजीज, डॉ. वैशाली अजने, डॉ. गजानन मुधोळकर, डॉ. सय्यद युसुफ, डॉ. मुजाहिद अन्सारी, प्रा. शोएब सिद्दिकी, शेख सनोबर, मिर्झा इस्माईल बेग (बाबा भाई) तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending