September 21, 2024

शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला; या नेत्यांची नावे चर्चेत

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो

मुंबई :– राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde–Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारने नुकतीच बहुमत चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम १२ किंवा १३ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि त्यानंतर १८ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार आहे. या दोन्हीतील मुहूर्त साधत अधिवेशनापूर्वी या नव्या मंत्र्यांना जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळात भाजपचे (BJP) २५ ते ३० तर एकनाथ शिंदे गटाचे १४ ते १५ मंत्री असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची नावेदेखील पुढे येत आहेत.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

भाजपचे संभाव्य मंत्री :
मंत्रिमंडळातील भाजपच्या संभाव्य आमदारांची नावे समोर येत आहेत. यात प्रामुख्याने गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, संजय कुटे, मदन येरावार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संदीप धुर्वे, रणजित सावरकर, अतुल सावे, संभाजी निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील, मेघना बोर्डीकर,चंद्रकांत पाटील, राहुल कुल, महेश लांडगे, जयकुमार गोरे, राम सातपुते, रणजित मोहिते पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे यांचा समावेश होऊ शकतो.

ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन

शिंदे गटातून यांची नावे चर्चेत
तर शिंदे गटातून स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह अनिल बाबर, शंभुराज देसाई, संजय शिरसाट, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, सदा सरवणकर, प्रकाश अबीटकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शहाजी बापू पाटील, बच्चू कडू, भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, लता सोनवणे, मंजुळा गावीत यांच्या नावांचा विचार केला जात आहे.

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending