September 21, 2024

अंधारी: टोमॅटो पीकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव; दीड एकरातील ‘टोमॅटो’वर शेतकऱ्यांने फिरवला ट्रॅक्टर

0
Contact News Publisher

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

अंधारी:सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केलेली आहेत.परंतु या पिकावर ऐन फुलोर्यात येताच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उभी झाडे वाळून जात असल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.महागडी बी बियाणे औषधी खर्च करूनदेखील हातचे जात असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहेत.अंधारी येथील शेतकरी योगेश भानुदास गोरे.दिड एकर टोमॅटोची लागवड केली.या पिकास सदरील शेतकर्यांनी मजूरी तसेच महागडी खते औषधी फवारणी केली परंतु ऐन हे टोमॅटोचे पीक फुलोऱ्यात असतानाच मागील आठवड्याभरापासून शेतातील उभी झाडे ठिकठिकाणी सुकून वाळून जात असल्याने सदरील शेतकर्यांने विविध उपाययोजना करूनही ही झाडे दिवसेंदिवस सुकून वाळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने बुधवार (दि.६) आपल्या दीड एकर शेतातील टोमॅटो पीक उपटून टाकले आहेत.सदरील शेतकर्यांचे या पिकावर जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च झाले असून पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत

Crop Loan| पीक कर्ज योजना: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना माहिती

अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शेतकरी योगेश भानुदास गोरे यांच्या शेतातील दीड एकर ऐन फुलोर्यात असलेल्या टोमॅटोची अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने सुकून वाळून जात असल्याने उपटून टाकली आहेत.(छायाचित्र: दीपक सिरसाठ)*

ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending