September 21, 2024

औरंगाबाद महानगरपालिकेतील ‘या’ अधिकाऱ्यांसह बिल्डरा विरोधात ‘अँटिकरप्शन’ विभागकडे तक्रार

0
Contact News Publisher

तक्रार दाखल कॉपी 

  • क्राईम टाईम्स ब्युरो

वरील विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, औरंगाबाद महानगरपालीका हहितील सातारा परिसरातील गट क्र.५३ मध्ये महानगरपालीकेतील अधिकारी १) जयंत खरवडकर, तत्का. उप संचालक, २) विवेक मधुकर खरवडकर, उप अभियंता नगर रचना विभाग, ३) अविनाश देखमुख, उप संचालक, नगर रचना विभाग, ४) संजय चामले, शाखा अभियंता यांनी व बिल्डर १) शशांक सुभाष मालखरे, २) मंदाकीनी रामचंद डोंगरे, जी.पे. धारक डॉ. पुरुषोत्तम शांताराम कुलकर्णी व रॉयल पाम्स, ए.बी.एस. गॅलक्सी चे १) अमर साकला २) भुषण कांकरीया व इतर यांनी महानगरपालीकेतील वरील अधिकारी यांना हाताशी धरुन संगनमत करुन कट रचुन गट क्र. ७३, सातारा परिसर मधील गणपती देवस्थानाची जमीनीतुन शासनाचा अधिकृत मंजुर नसलेला रस्ता तेथुन पुर्वीचा रस्ता आहे असे दर्शवुन गट क्र.५३ मधील ४ ऐकर जमीनीचे लेआऊट मंजुर केले तसेच त्या ठिकाणी मोठ मोठे टॉवर (इमारत) उभे केले. गट क्र. ७३ मधील जमीन ही गणपती देवस्थान ट्रस्टची आहे. ती जमीन हडप करण्याचा डाव महानगरपालीका अधिकारी व नमुद बिल्डर यांनी कट रचला असुन तेथुन रस्ता दाखवुन महानगरपालीकेची बेकायदेशीर रित्या मंजुरी मिळवली आहे.

House list : नवीन घरकुल यादी मध्ये आपले नाव पहा मोबाईलवर

सविस्तर हकिकत अशी की, गट क्र. ५३, सातारा परिसर मध्ये डोंगरे, मालखरे व इतर यांची जमीन आहे. हि जमीन जी.पे. धारक कुलकर्णी यांनी विकसीत करण्यासाठी घेतली आहे. परंतु या गटात जाण्यासाठी हक्काचा रस्ता नसल्याने त्यांची जमीन विकसीत करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी भुमी अभिलेख कार्यालय औरंगाबाद येथुन सन २०११ साली जमीनीची मोजनी केली व त्या जमीनीचा नकाशा तयार केला तेव्हा त्यामध्ये गट क्र.५३ मध्ये जाण्याकरीता रस्ता नसल्याने महापालीकेची मंजुरी जमीन विकसीत करण्यासाठी मिळत नव्हती. त्यामुळे मनपा अधिकारी, औरंगाबाद श्री. जयंत खरवडकर व विवेक खरवडकर यांनी बिल्डर यांचेशी संगणमत करून मुळ

ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन

मोजणी नकाशा गट क्र.५३ मध्ये जाण्याकरीता गट नं.७३ मधील गणपती मंदीराची जागा (वर्ग-२) मधुन रस्ता असल्याचे फेरफार करुन खोटे कागदपत्र तयार केले. त्या बदल्यात गट क्र. ५३ मध्ये

जयंत खरवाडकर यांना ३० गुंठे व विवेक मधुकर खरवडकर यांना ३१ गुंठे जमीन दिलेली असुन त्यांचे नावे ७/१२ मध्ये सदर जमीन फेर करुन घेण्यात आली आहे. तसेच अविनाश देशमुख व संजय चामले व इतर अधिकरी यांनी आर्थिक गैरव्यवहार करुन गट नं. ५३ मधील लेआऊट व बांधकाम परवाणग्यांना मंजुरी दिली आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

श्री. जयंत खरवडकर, विवेक खरवडकर, अविनाश देशमुख, संजय चामले व संबंधीत सर्व बिल्डर हया सर्वांनी संगनमत करुन कट रचुन बनावट कागदपत्र तयार करुन स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी चुकीच्या लेआऊट व बांधकाम परवानगी दिली. व औरंगाबाद महानगरपालीका व शासनाचे मोठयाप्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे. तसेच गट नं. ५३, सातारा मध्ये प्लॉट विक्री केले व मोठ मोठया इमारती बांधुन फ्लॅट विक्री केले त्यामुळे सदर प्लॉट व फ्लॅट धारकांची सुध्दा फसवनुक करण्यात आली.

तरी मा.साहेबांनी वरील प्रकरणांची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी हि नम्र विनंती.

(सोबत पुराव्यांचे कागदपत्राची फाईल जोडली आहे.)

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending