September 21, 2024

अंधारी,लोणवाडी,पळशी रास्ता झाला खड्डेमय; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

0
Contact News Publisher

खड्डेचं खड्डे चोहीकडे रास्ता गेला कुणीकडे!

  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

अंधारी :सिल्लोड तालुक्यातील अंधारी लोणवाडी पळशी परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावांचा रहदारीचा मुख्य रस्ता असलेला अंधारी ते लोणवाडी पुढे पळशी हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून या रस्त्याची गेल्या एक ते दीड दशकापासून अत्यंत दुरवस्था झाली असून परिसरातील वाहनधारकांसह प्रवासी

House list : नवीन घरकुल यादी मध्ये आपले नाव पहा मोबाईलवर

ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे मागील काही दिवसांपूर्वी अंधारीसह लोणवाडी रस्त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून डागडुजी केली परंतु अंधारी पासून ते लोणवाडी पुढे पळशी पर्यंतच्या दहा किलोमीटर रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून लालफितीत अडकले आहे निवडणुका आल्या की पुढारी तसेच लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या दुरुस्तीची आश्वासने देतात आणि निवडणुका संपल्या की ही आश्वासने हवेत विरतात एकीकडे शासन शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्ते पक्के व्हावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना च्या रस्त्याकडे मात्र कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत.

Crop Loan| पीक कर्ज योजना: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना माहिती

हा रस्ता सिल्लोड जाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांना जवळचा व शॉर्टकट मार्ग असल्याने प्रवासासाठी सोयीचा आहे परंतु याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत रस्त्याचे डांबरीकरन न झाल्याने या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहेत शिवाय या रस्त्यावर ठिकठिकाणी फूट दीड फुटाचे खड्डे असून पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यात वाहने आदळली जात असल्याने छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अंधारी ते लोणवाडी पुढे पळशी या दहा किलोमीटर रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील वाहनधारकांसह प्रवासी ग्रामस्थांनी केली आहे

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महाराष्ट्र 2022 कृषी अनुदान संपूर्ण माहिती, अर्ज

प्रतिक्रिया : खालेद पटेल (जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद तथा अंधारी ग्रामपंचायत सदस्य ) : सिल्लोड तालुक्यातील अंधारी लोणवाडी पळशी परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावांचा रहदारीचा मुख्य रस्ता असलेला अंधारी ते लोणवाडी पुढे पळशी हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून या रस्त्याची गेल्या एक ते दीड दशकापासून अत्यंत दुरवस्था झाली असून परिसरातील वाहनधारकांसह प्रवासी ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याचे नव्याने दुरुस्ती करून डांबरीकरण करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल

भाऊसाहेब सुलताने :(सरपंच लोणवाडी) अंधारीसह लोणवाडी रस्त्यावर मागील वर्षी थातूरमातूर मुरूम टाकून डागडुजी केली परंतु अंधारी पासून ते लोणवाडी पुढे पळशी पर्यंतच्या दहा किलोमीटर रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून लालफितीत अडकले आहे.संबंधित विभागाने या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण त्वरित करावे.

अंकुश तायडे :(शेतकरी अंधारी )परिसरातील अठरा ते वीस गावांचा मुख्य रहदारीचा असलेला अंधारी लोणवाडी पळशी रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने परिसराचा विकास खुंटला आहे संबंधित विभागाने या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने वाहनधारकांसह प्रवासी ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे .
मिन्नाज शेख: ( वाहनचालक )अंधारी ते लोणवाडी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने पावसाळय़ात या रस्त्यात पाणी साचले जात असल्याने वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही यामुळे वाहने तर खिळखिळ होतातच व अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन

छायाचित्रे ओळ:अंधारी लोणवाडी पुढे पळशी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .(छाया :दीपक सिरसाठ)

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending