सावधान ! श्रावणमास निमित्ताने औरंगाबाद धुळे व फुलंब्री मार्गे खुलताबाद कन्नड वाहतुकीत बदल

शनिवारी रात्री पासून या सर्व वाहतुकीत बदल होणार
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
ज्याअर्थी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी खुलताबाद यांचे पत्र जा.क्र. ३४३७/२०२२ दि.१३/०७/२०१२ अन्वये कळविले की, दिनांक ३०/०७/२०२२ ते २७/०८/२०२२ या दरम्यान हिन्दु धर्मीयांचा श्रावण मास साजरा होत आहे. सदर महिन्यात प्रत्येक शनिवारी श्री. भट्टामारोती देवस्थान खुलताबाद व श्री घृष्णेश्वर मंदीर वेरुळ येथे दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपयातुन लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. यावर्षी श्रावण महिन्यात ०४ शनिवार व ०४ सोमवार येत आहेत.
ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन
दिनांक ०१/०८/२०२२, ०८/०८/२०२२, १४/०८/२०२२, २२/०८/२०२२ असे ०४ सोमवार व दिनांक ३०/०७/२०२२, ०६/०८/२०१२, १३/०८/२०१२ २० / ०२ / २०२२, २७/०८/२०२२ असे ०५ शनिवार येत आहेत. खुलताबाद व वेरूळ ही देवस्थाने सोलापुर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र.७२ वर असल्याने त्यावर मोठया प्रमाणात जड वाहनाची वास्तुक चालु असते. व खुलताबाद ते फुलंब्री या मार्गावर सुध्दा मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतुक चालु असते. तसेच तिसया श्रावण सोमवारी दिनांक १४/०८/२०१२ रोजी भाविक वेरुक येथील तीर्थकुंडातून भोपळ्यात पाणी भरून कावडीव्दारे मराठवाडयातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. सदरचे भाविक हे गटागटाने व घोळक्याने सोलापुर धुळे महामार्गानि पायी येतात व जातात. त्यावेळी वेरुळ जवळील महामार्गावर वाहनांची वाहतुक कोंडी निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणुन खालील प्रमाणे वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO
१) औरंगाबाद कडुन कन्नड धुळे कडे जाणारी सर्व जड वाहने ही दौलताबाद टी पॉईट माळीवाडा कसाबखेडा फाटा मार्गे वेरुळ कन्नड कडे जातील.
२) कन्नड कडून येणारी सर्व जड वाहने वेरुळ कसाबखेडा फाटा माळीवाडा मार्गे औरंगाबाद कडे येतील.
३) फुलवी मार्गे खुलताबाद कन्नड कडे जाणारी सर्व जड वाहने औरंगाबाद कसाबखेडा फाटा वेरुळ मागे कन्नडकड़े जातील.
(४) वेरुळ खुलताबाद कडून फुलंबी कडे जाणारी वाहने ही वेस्क कसाबखेडा फाटा माळीवाडा मार्गे औरंगाबाद कडे जातील.
त्याअर्थी भी, मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दि.२९/०७/२०२२ रोजी व श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्रीचे २०.०० वाजे पासुन ते मगळवारी सकाळी ०८.०० वाजे पर्यंत व दि.२८/०८/२०१२ चे सकाळी ०८.०० वा पावेतो वरील मार्गाने जाणारी सर्व जड वाहतूक दौलताबाद टी पॉईट पासुन ते वेरुळ पर्यंत व फुलंगी ते खुलताबाद पर्यंत भाविकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. नमुद •आदेश माझ्या सही व शिक्या निशी दिनांक २६/०७/२०२२ रोजी दिलेले आहेत.