September 21, 2024

अडीच हजारावर सापांना जीवदान देणारा सर्पमित्र – अक्षय विध्वंस

0
Contact News Publisher

अक्षयला लहानपणापासूनच निर्सगाची आवड आहे. त्यानंतर त्याने निसर्गातील प्रत्येक गाेष्टीचा अभ्यास सुरू केला. किडे, झाडे, वेली, प्राणी यासाेबतच सापांचाही अभ्यास सुरु झाला. त्यात त्याला सापाचे जग वैशिष्टपूर्ण वाटले

  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

अंधारी :अक्षयला लहानपणापासूनच निर्सगाची आवड आहे. त्यानंतर त्याने निसर्गातील प्रत्येक गाेष्टीचा अभ्यास सुरू केला. किडे, झाडे, वेली, प्राणी यासाेबतच सापांचाही अभ्यास सुरु झाला. त्यात त्याला सापाचे जग वैशिष्टपूर्ण वाटले. सापाच्या हालचाली रचना, रंग यामुळे त्याचे आकर्षण वाढत गेले. अनेक पुस्तके आणि सर्पतज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत अभ्यास सुरू केला. पहिला साप त्याने ७ जून २०११ राेजी पकडला आणि तेथून सुरू झाला त्याचा सर्पमित्र म्हणून प्रवास.

crop insurance शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान शासन निर्णय आला पहा कोण पात्र आहे

: साप… म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हाच अनेकाचा समज. पण ताेच साप जेव्हा एखादा सर्पमित्र पकडताे तेव्हा आश्चर्य वाटते. ही मंडळी साप कसे पकडत असतील त्यांना भीती वाटत नाही का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण हाेतात. सापांचे जग अद्भूत आहेत. अशाच या अद्भूत जगतात सर्प प्रेमाने एक तरुण झपाटला आहे. आतापर्यंत त्याने अडीच हजारांवर विषारी, बिन विषारी सापांना जीवदान दिले आहे. हा तरुण आहे, सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील गरीब कुटुंबातील अक्षय लहानपणापासूनच निर्सगाची आवड आहे. त्यानंतर त्याने निसर्गातील प्रत्येक गाेष्टीचा अभ्यास सुरू केला. किडे, झाडे, वेली, प्राणी यासाेबतच सापांचाही अभ्यास सुरु झाला. त्यात त्याला सापाचे जग वैशिष्टपूर्ण वाटले. सापाच्या हालचाली रचना, रंग यामुळे त्याचे आकर्षण वाढत गेले. अनेक पुस्तके आणि सर्पतज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत अभ्यास सुरू केला. पहिला साप त्याने ७ जून २०११ राेजी पकडला आणि तेथून सुरू झाला त्याचा सर्पमित्र म्हणून प्रवास.

ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO

अक्षय सांगताे वनविभाग जसे इतर प्राण्यांच्या बाबतीत गावात शिरले की त्याला पकडून जंगलात साेडून देतात. परंतु सापासाठी कुणी धावून येत नाही, अनेकदा परिसरातील नागरिकच सापाला यमसदनी धाडतात.अंधारी परिसरात असे मारले जाणारे अनेक साप त्याने बघितले. तेथूनच त्याने ठरविले की आता परिसरात सापाला मारू द्यायचे नाही. अक्षय परिसरातील ३०-३५ गावात कुठेही साप निघाला की पकडायला जाताे आणि त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करताे. असा हा सर्पमित्र सध्या अंधारी परिसरात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी अक्षय सापाबद्दल असलेले नागरिकांचे गैरसमज दूर करणार आहे.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

क्षणाचाही विलंब न लावता पाेहाेचताे गावातकुणाच्या घरी साप निघाला की अक्षयला फाेन येताे ताे क्षणाचाही विलंब न करता थेट साप निघालेल्या घरी पाेहाेचताे. रात्र असाे, पाऊस असाे, ऊन असाे की वारा सापाला पकडून ताे जीवदान देताे. यामाेबदल्यात ताे काेणताही पैसा घेत नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending