गावोगावचे पार गेले काळाच्या पडद्याआड; पार हरवले आणि गावकऱ्यामधला संवादही
पुर्वजांच हे वैभव जपल पाहिजे
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
अंधारी : पूर्वी ग्रामीण भागातील गाव – खेड्यात सार्वजनिक पाराला अन्य साधारण महत्व होते. गावाचं – खेड्याचं कोणतीही सार्वजनिक काम, संकट, भांडणतंटे हे त्या पारावर सोडली जातं. त्या पारावरूनचं गावकऱ्यांचा संवाद चालायचा. काळाच्या ओघात मात्र हे सार्वजनिक पार लोप पावत गेले. त्याच बरोबर येथून चालणारा गावगाडा आणि गावकऱ्यांमधला एकमेकांबरोबर होणारा संवाद ही लोप पावला आहे. पुर्वीच्या काळी प्रत्येक गावा – खेड्यात धार्मिक स्थळ, चावडी जवळ मोक्याच्या ठिकाणी मोठ्या पिंपळ, वडांसारख्या झाडाखाली सार्वजनिक पार असायचे
असे. हा पार म्हणजे गावां- खेड्यांचे मुख्यालयच असायचं. या पारावरून गावगाडा (कारभार ) चालायचा. गावां – खेड्यांत काही संकट, भांडणतंटे, भावकीतील वाद, जमिनीचे वाद नव्हेतर कौटुंबिक वाद देखील सोडले जायचे. हे काम करण्यासाठी पंच मंडळी ठरलेली असायची
हेही वाचा : शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली
crop insurance शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान शासन निर्णय आला पहा कोण पात्र आहे
कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती
पारा ऐवढेच चावडीचे महत्व
गावात चावडी हे एक ठिकाण महत्वाचं असायचं कारण चावडी हा सार्वजनिक निवारा असायचा. या ठिकाणी गावातील धार्मिक, संस्कुतीक, लग्न असे संभारंभ व्हायचे. सार्वजनिक साहित्य देखील तेथेच ठेवले जायचे. कधी पाहुणे आले तर निवारा म्हणुन चावडीचा उपयोग केला जायचा. त्यामुळे पारा बरोबरच चावडी देखील गावासाठी महत्त्वाची असायची.
. या सर्व गोष्टी पारावर पार पडत असल्याने लोकांमध्ये एकोपा टिकून रहायचा प्रकरण जाग्यावर संपुष्टात यायची. पारावर पंचायत नसायची तेव्हा रोज सकाळी संध्याकाळी गावातील मंडळी जमायची आणि गप्पा गोष्टी व्हायच्या त्यामुळे गावातील गावकऱ्यांमध्ये
सलोख्याचे संबंध राहून संवाद वाढायचा. पार गांवचे वैभव होते
agriculture बांधावर झाडे लावण्यासाठी मिळणार ५०% टक्के अनुदान असा करा अर्ज
online application 2022 : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती
चौकट
ग्रामीण भागातील पाराचे वैभव संपलं असलं तरी काही गावांमध्ये पार चावड्या आहेत. त्याचा उपयोग पुर्वी सारखा सामाजिक कामांसाठी होत नाही. हे दुर्दैव आहे. ज्या ठिकाणी हे वैभव आहेत ते जपन गरजेचं आहे. नाही तर पुढच्या पिढ्यांना पार चावडी हे गावांचे वैभव होते हे कधीतरी योगायोगाने पुस्तकात वाचायला मिळेलं हे नक्की.
अंधारी : आजच्या मोबाईल युगात आजच्या युवा पिढीत संवाद आणि एकत्र येऊन गप्पा मारणे दुर्मीळ होताना दिसून येत आहे .परंतु ग्रामीण भागात आजही वयस्कर लोक अशाप्रकारे एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतानाचे बोलके छायाचित्र
औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत