September 21, 2024

..साहेब नुसतं तांदुळावरच जगायचं का आम्ही!; एपीएल कार्डधारकांची आर्त हाक

0
Contact News Publisher

सिल्लोड तालुक्यातील एपीएल कार्डधारकांची आर्त हाक

  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

अंधारी :तालुक्यातील शेतकऱ्यांना एपीएल शेतकरी योजना अंतर्गत तीन किलो गहू तर दोन किलो तांदूळ आतापर्यंतच दिले जात होते मात्र गेल्या तीन महिन्यांपासून एपीएल धारक शेतकरी कुटुंबातील कार्डधारकांना रेशन दुकानांनी कात्री लावल्याने केवळ प्रति व्यक्ति दोन किलो तांदळाचा समाधान मानावे लागत आहे त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला शेतकऱ्यांतून विरोध होत असून साहेब आता नुसते तांदूळच कसे खायचे आम्ही असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत सिल्लोड तालुक्यात एकूण ( दहा हजार सातशे ३३ ) कार्डधारक आहेत तर या कार्डधारकांना मध्ये सुमारे ( अडुसष्ठ हजार तीन शे अकरा )शेतकऱ्यांची संख्या आहेत

हेही वाचा : औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

राज्यात दुष्काळग्रस्त असणाऱ्या सुमारे चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एपीएल शेतकरी योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदळाचे वितरण केले जात होते दुष्काळग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये संपूर्ण मराठवाड्यातील चौदा जिल्ह्यांचा सहभाग होता मात्र शासनाने आता दुष्काळग्रस्त भागात असणाऱ्या या चौदा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या हक्काचे गव्हाला कात्री लावली असून तालुक्यातील गावाना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागच्या माध्यमातून सुमारे तालुक्यात एकूण (२०५ )स्वस्त धान्य राशन दुकाने आहेत या रेशनच्या अंतर्गत गावातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तांदूळ आणि गव्हाचे वितरण केले जाते शासनाने रेशन दुकानात अंतर्गत विविध वर्गवारी पध्दत करून शेतकरी कुटुंबातील कार्डधारक प्राधान्य शेतकरी कुटुंब कार्डधारक शासकीय नोकरीला असणारे कार्डधारक अशी वेगवेगळी वर्गवारी करण्यात आलेली आहे या वर्गवारीच्या माध्यमातूनच गावखेड्यातील गरजू कुटुंबांना स्वस्त धान्य दिले जाते मात्र शासनानेच आता एपीएल धारक शेतकरी योजनेत असणार्या शेतकऱ्यांना गहू बंद करून प्रति व्यक्ती केवळ दोनच किलो तांदूळ गेल्या तीन महिन्यांपासून देत आहेत त्यामुळे या शेतकर्यांना मोठा अन्याय झाला त्यामुळे बळीराजाने रोष व्यक्त केला आहे

crop insurance शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान शासन निर्णय आला पहा कोण पात्र आहे

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

Poultry farming : जिल्हा परिषद योजना शेळीपालनासाठी 75 % तर कडबाकुट्टी साठी 50टक्के अनुदान वर अर्ज सुरु

चौकट :सिल्लोड तालुक्यामध्ये एपीएल धारक शेतकर्यांसह प्राधान्य कुटुंबातील शेतकऱ्यांनाही दोन किलो तांदूळ तीन किलो गव्हाचे वितरण केले जात होते मात्र गेल्या तीन महिन्यांपासून रेशन दुकानांतून दिल्या जाणार्या गावाला कात्री लावली असून शेतकऱ्यांना केवळ तांदूळच मिळत आहे त्यामुळे तालुक्यातील एपीएल कार्डधारक एकूण ( १०७३३)एवढे येत असून या शेतकरी कुटुंब या शेतकरी कुटुंबात एकूण सदस्य संख्या (६८३११ )एवढी कुटुंबसंख्या आहे त्यामुळे गव्हाची सुमारे ( २०४९३३ )गव्हाची आवक तालुक्याची कमी झाली आहे परिणामी गहू कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहेत.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022 माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 Form

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending