‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव -हर घर तिरंगा घर घर तिरंगा कोहिनूर शिक्षण संस्थेची खुलताबादेत जनजागृती प्रभात फेरी

खुलताबादेत जनजागृती प्रभात फेरी
- क्राईम टाईम्स टीम
- नाविद शेख
खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. मजहर खान साहेब व सचिव माननीय श्रीमती आस्मा खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.मकसूद खान साहेब यांच्या उपस्थितीत दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी जनजागृती निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी , गावातील प्रतिष्ठित नागरिक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मधुकर हिवाळे , उपप्राचार्य डॉ. रफीउल्ला खान , डॉ.शेख आरिफ , प्रा. शोएब सिद्दिकी, डॉ.सुभाष जिते, डॉ.सय्यद युसुफ, शेख बादशहा, सय्यद इरफान तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात देशभक्तीपर वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.शेख हनीफ,डॉ. वैशाली अजने, डॉ. सुषमा सुर्वे,प्रा. शेरखान पठाण, प्रा. शांतीलाल गायकवाड ,डॉ.रमेश देवडे,प्रा. प्रकाश लहाने डॉ शेख असलम गजानन बोरसे सर सोहेल सय्यद सर इम्तियाज सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत