गंगापूर-खुलताबादेतील सर्व सरपंच-उपसरपंच ग्रामसेवकानो महावितरण संबंधी समस्या असेल तर माहिती द्या- आ. बंब

गंगापूर-खुलताबादेतील सर्व सरपंच-उपसरपंच ग्रामसेवकानो गावं सह शेत परिसरातील सर्व समस्यांची माहिती ई मेल वर पाठवा
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
विषय:- आपल्या गावातील सार्वजनिक विजेच्या समस्यांसंदर्भात मंत्रालय मुंबई येथे मा. उप मुख्यमंत्री तसेच संबंधित महावितरण कंपनीचे अधिकारी यांचे समवेत बैठकीमध्ये चर्चा करण्यासाठी आवश्यक असलेली खालील नमूद माहिती दि.१८ ऑगस्ट २०२२ चे आत माझे ई-मेल आयडीवर उपलब्ध करून देणे बाबत.
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, आपल्या गावातील सार्वजनिक विजेच्या ज्या काही समस्या आहेत, जसे की, विजेचे वाकलेले पोल्स्, लोंबकळलेल्या तारा, जळालेले तसेच खराब झालेले रोहित्र, नविन रोहित्र बसविणे, अतिभारीत झालेले रोहित्र, अशा एकुण गावातील व शेतीच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व समस्या येत्या दोन वर्षात मार्गी लावणे करिता यावर मला काम करायचे आहे. जेणेकरून याचा गावांसाठी व शेतीकरीता दुरगामी परिणाम होईल. यासाठी मा. उप मुख्यमंत्री तसेच महावितरणचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत येत्या २० ऑगस्ट २०२२ पर्यंत मंत्रालय, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. करीता मला उपरोक्त नमूद सर्व इतंभूत माहितीची आवश्यकत आहे.
येथे क्लिक करून माहिती द्यावी
वरीलप्रमाणे नमूद माहिती माझ्या prashantbumb111@gmail.com या ई-मेल आयडीवर, दि. १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत पाठविण्यात यावी, ही विनंती.
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022