September 21, 2024

Braking news -उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; सरन्यायाधीश रमण्णांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

0
Contact News Publisher

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

  • क्राईम टाईम्स डिजिटल टीम

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर महाविकास आघाडी कोसळून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) अस्तित्वात आले. एवढेच नाही तर शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणाकडे जाणार याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray Group) एकनाथ शिंदे गटाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता याबाबत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाविरोधातील ठाकरे गटाच्या या याचिकेवर सुनावणीचा महत्त्वाचा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी घेतला आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा यांच्याच खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

आता याबाबत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा महत्त्वाचा निर्णय सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे या याचिकेच्या सुनावणीबाबत मत नोंदवताना सरन्यायाधीश रमण्णा यांनी ‘आम्हाला निर्णय द्यावाच लागेल’, असे सूचक विधानही केले आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांनी आतापर्यंत या प्रकरणात घटना आणि कायद्यांवर बोट ठेवून कठोर निरीक्षणे नोंदवली होती. विशेष म्हणजे रमण्णा यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून दाखल याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याची आवश्यकता आहे का, यावरही विचार करत असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. विद्यमान सरन्यायाधीश रमण्णा २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. अशात देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण; प्रपत्र ड सर्वेक्षणमध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या व नवीन पात्र कुटूंबाना मिळणार घरकुल

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending