September 21, 2024

महिला व बालविकास विभागात 195 जागांची भरती ; येथे क्लिक करून भरा अर्ज

0
Contact News Publisher

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागात कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर १९५ पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. १८ ते ४३ वयोगटातील अर्हता प्राप्त उमेदवारांना अर्ज करता येईल. १९ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

  • क्राईम टाईम्स डिजिटल टीम

महिला व बालविकास विभागात कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर विविध १९५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांची १० पदे आहेत. संरक्षण अधिकारी-२०, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी-२१,
समुपदेशक-१५, सामाजिक कार्यकर्ता-२३, लेखापाल-१८, डेटा विश्लेषक-१३, सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर-५०, आउटरीच वर्कर-२५ आदी पदांच्या एकूण १९५ जागा भरण्यात येणार आहेत. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पदासाठी पदव्युत्तर शिक्षण असणे गरजेचे आहे. तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. संरक्षण अधिकारी होण्यासाठीही पीजी आवश्यक आहे. कायदेशीरसह परीविक्षा अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे शिक्षण विधी शाखेत होणे गरजेचे आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

येथे क्लिक करून अर्ज भरा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखापाल पदासाठी पदवी आणि एक वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. डेटा विश्लेषक पदासाठी सांख्यिकीशास्रातील पदवी असणे अनिवार्य आहे. आऊटरिच वर्कर आणि सहायक डेटा एंट्री ऑपरेटरसाठी किमान १२ वी उत्तीर्ण आणि उत्कृष्ट संवाद कौशल्य असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची राज्यात कुठल्याही जिल्ह्यात काम करण्याची तयारी असली पाहिजे, असे जाहिरातीत नमूद केले आहे. इच्छुक उमेदवारांनी www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन राहुल महिवाल यांनी केले आहे.

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

टोलमाफीबाबत नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा!

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending