September 22, 2024

अंधारीत तरुण शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स टीम
  • दीपक सिरसाठ

शेतकऱ्यांना दिलासा PM Kisan योजना :e-KYC करिता पुन्हा मुदतवाढ; क्लिक करून ‘ई-KYC केवायसी’ किंवा नवीन अर्ज करा

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील अल्पभूधारक शेतकरी भगिनाथ कोंडीबा दांगोडे यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील सोनारी शिवारात राहणारे शेतकरी भागीनाथ कोंडिबा दांगोडे (वय.४२) रा. अंधारी हे मंगळवारी रात्री पत्नी संगीता मुलगा विशाल दोन मुली अर्चना भारती कुटुंब यांच्यासोबत रात्रीचं जेवण करून झोपले पत्नी व मुले झोपी गेल्यानंतर भागीनाथ घरात नसल्याने पत्नी व मुले जागी झाली.त्यांनी आरडाओरड करून देर लक्ष्मण दांगोडे व महेंद्र यांना बोलाविले सर्वांनी रात्रभर शोधाशोध करून त्यांचा थांगपत्ता लागला नाही.बुधवारी (दि.१७) सकाळी सहाच्या सुमारास पुतण्या महेंद्र घरामागील शेतात गेला असता शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला भागीनाथ दांगोडे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.सदरील घटनेची माहिती अंधारी येथील पोलिस पाटील कल्पना दिनेश खराते यांना देण्यात आली.त्यांनी लगेच सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे बीट जमादार बावस्कर व भारती यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.त्यानंतर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांची पत्नी व नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून नापिकी व कर्जाच्या विवंचनेत होते.आमच्या घरातील कर्ता पुरूष गेल्यामुळे आम्ही उघड्यावर पडलो आहोत सदरील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांसह ग्रामस्थांनी केली आहे त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

महिला व बालविकास विभागात 195 जागांची भरती ; येथे क्लिक करून भरा अर्ज

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending