आमदार प्रशांत बंब यांना धमकी; ‘त्या’ महिलेविरोधात गुन्हा दाखल

अनेक संघटना, ग्रामपंचायतीचे आमदारांना पाठींब्याचे पत्र जाहीर
खुलताबादेत ही गुन्हा दाखल होण्याची शक्यता तर अनेक ग्रामपंचायतीने पत्राद्वारे आमदारांना पाठिंबा
- क्राईम टाईम्स टीम
- नाविद शेख
औरंगाबाद: शिक्षकांनी मुख्यालयी राहावे, याविषयी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलेले प्रकरण चांगलेच तापले असून याप्रकरणी आमदारांना फोनवर जाब विचारून अर्वाच्च भाषा वापरत धमकी दिल्याप्रकरणी गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव पोलिसांत शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात
गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सर्व शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालयीच वास्तव्यास असणे आवश्यक आहे, असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता व अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी व शिक्षक मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक करतात, असेही ते म्हणाले होते. त्यावरून अनेक शिक्षकांनी आमदार बंब यांना फोन करून याविषयी जाब विचारला होता. यातील अनेक संभाषण समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. त्यापैकी एका शिक्षकाच्या पत्नीने आमदार बंब यांना फोन करून धमकी देऊन अर्वाच्च भाषा वापरून बदनामी केली म्हणून लासूरच्या सरपंच मीना पांडव यांच्या फिर्यादीवरून गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गुन्हा दखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउनि शेख हे करीत आहेत.
खुलताबादेत ‘ही’ त्या महिलेविरोधात तक्रार
खुलताबाद पोलीस ठाण्यात देखील काही महिलांनी त्या महिलेविरोधात निवेदन दिले आहेत तर त्या माहिलेवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा