औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

- क्राईम टाईम्स टीम
शेजारी पतीपत्नी, मुलगा आणि स्वतःचा नवरा यांची सततची मारहाण व तक्रार करूनही त्यांच्यावर पोलीस कारवाई होत नसल्यामुळे त्रस्त महिलेने पोलीस आयुक्तालय गाठून अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची खळळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली होती. ६० टक्क्यांपेक्षा अधिक जळालेल्या या महिलेचा आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
आमदार प्रशांत बंब यांना धमकी; ‘त्या’ महिलेविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….
सविता दीपक काळे (३४, रा. मांडवा, ता. गंगापूर) असे या महिलेचे नाव आहे. त्यांना १७, १५ वर्षांच्या दोन मुली आणि ११ वर्षांचा मुलगा आहे. दीपक काळे चालक असून त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा सविताचा संशय आहे. यातून ती महिला, तिचा पती आणि मुलगा तिच्याशी सतत भांडत असतं. याला सविताचा पती साथ देत असे. याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. मात्र पोलीस दुर्लक्ष करता असल्याची सविताचा तक्रार होती. यातूनच सविता गुरुवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात आली.
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
आयुक्तालयाच्या पायरीवर सोबत आणलेले डिझेल अंगावर ओतून सविताने पेटवून घेतले. त्यांना पोलिसांनी लागलीच घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र 60 टक्के जळालेल्या सविता यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान, वाळूज पोलिसांनी हा कौटुंबिक वाद होता गेल्या दहा वर्षापासून त्यांचे भांडण होते. याची वेळोवेळी दखल घेण्यात आली होती अशी। माहिती दिली आहे.
नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर