IND vs PAK, Asia Cup 2022: भारत विरुद्ध पाकिस्तान पु्न्हा भिडणार; आता प्रतीक्षा आहे फक्त रविवारची, जाणून घ्या सुपर-4 चे वेळापत्रक
मोहम्मद रिझवान, खुशदिल शाह आणि शादाब खान यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने हाँगकाँगचा 155 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पाकिस्तानच्या 193 धावांसमोर हाँगकाँगचा संघ अवघ्या 38 धावांत गारद झाला
ASIA CUP -2022: सर्वांच्या नजरा या यष्टिरक्षक फलंदाजावर असतील
निर्णय झाला आहे, तारीखही निश्चित झाली आहे आणि वातावरण तयार झाले आहे. आता प्रतीक्षा आहे फक्त रविवारची. आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये सात दिवसात भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ दुसऱ्यांदा भिडणार आहेSuperत आणि यासह दोन्ही संघांच्या चाहत्यांसह जागतिक क्रिकेट पुन्हा एकदा एक विलक्षण दृश्य सादर करणार आहे. या शेवटच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव करून पाकिस्तानने (PAK vs HK) सुपर फोर (Super-4) फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. यासोबतच रविवार, 4 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टक्कर होणार आहे. मोहम्मद रिझवान, खुशदिल शाह आणि शादाब खान यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने हाँगकाँगचा 155 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पाकिस्तानच्या 193 धावांसमोर हाँगकाँगचा संघ अवघ्या 38 धावांत गारद झाला.
ऑनलाईन Pan कार्ड : पाच मिनिटात डाउनलोड करा ई-पॅन कार्ड ; पहा कसे करावे
आशिया कप 2022 सुपर-4 वेळापत्रक
3 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (शारजाह)
4 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
6 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका (दुबई)
7 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (शारजाह)
8 सप्टेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दुबई)
9 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
रवींद्र जडेजा या स्पर्धेतून बाहेर
दरम्यान आशिया चषक 2022 च्या सुपर-4 मध्ये प्रवेश करताच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. जडेजाच्या वगळण्याचे कारण गुडघ्याची दुखापत आहे. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली असून त्याच्या जागी अक्षर पटेलचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली
रवींद्र जडेजाची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी चांगली
रवींद्र जडेजाची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी पाहता, पाकिस्तानी संघाला त्याला बाहेर पाहून आनंद वाटेल कारण त्याने भारताला शेवटचा सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या सामन्यात जडेजावर विसंबून रोहित शर्माने त्याला वरच्या क्रमाने फलंदाजीसाठी पाठवले, जडेजानेही आपला विश्वास खरा ठरवला. मात्र, अक्षर पटेलही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने जडेजाच्या बाहेर पडल्याने पाकिस्तानला फारसा दिलासा मिळणार नाही. आता अक्षर पटेलला संघ इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहावे लागेल.
ऑनलाईन पध्दतीने वैयक्तिक शौचालयाची मागणी करा- औरंगाबाद जिल्हा परिषद CEO