September 22, 2024

जमीन : कुळ म्हणजे काय! कुळाचे प्रकार किती व कोणते..

0
Contact News Publisher

दुसऱ्या व्यक्तींच्या मालकीची कोणतीही जमीन कायदेशीररित्या कसणारी व्यक्ती..कुळ..

पोट कुळ, साधे कुळ, संरक्षित कुळ या बाबतची माहितीका

वारसफेर हक्कसोड नोंदणी प्रक्रिया | वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?

कडून व्यक्तीश: कसण्यात येतं नसेल आणि जर जमीन कसणारी व्यक्ती मालकाच्या कुटूंबातील नसेल किंवा रोख रकमेत, वस्तूच्या रूपात, परंतू पिकाच्या हिश्श्याच्या रूपात नव्हे तर वेतनावर ठेवलेला नोकर नसेल, किंवा मालकाच्या अथवा मालकाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखी खालीं मजुरी घेऊन जमीन कसत नसेल, किंवा कब्जे-गहाणदार व्यक्ती नसेल तर अशा व्यक्तीस कुळ किंवा सर्वसाधारण कूळ म्हणतात.

वारसफेर हक्कसोड नोंदणी प्रक्रिया | वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?

ही तर झाली पुस्तकी व्याख्या. आता एक सोपे उदाहरनाद्वारे आपण समजून घेऊया. रमेश हे जमीन मालक आहेत. आणि सुरेश हा कुळ आहे. सुरेश हा रमेशच्या कुटुंबातील व्यक्ती नसला पाहिजे. त्याच प्रमाणे सुरेश हा रमेश कडून पैसे, पिकातील हिस्सा किंवा काही वस्तू, वेतन किंवा पगार, स्वीकारत नसावा. सुरेश हा रमेशच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखी खाली रोजंदारीवर किंवा सालगडी म्हणून काम करत नसला पाहिजे. रमेशने त्याची स्वतःची जमीन सुरेशला गहाण खताने देऊन पैसे उचलून घेतले नसावे. तर आणि तरच या परिस्थितीत सुरेश हा रमेशच्या जमिनीवरील कुळ आहे असे मानले जाईल.

ऑनलाईन Pan कार्ड : पाच मिनिटात डाउनलोड करा ई-पॅन कार्ड ; पहा कसे करावे

कुळाचे प्रकार : आता आपण कुळाचे प्रकार पाहू. यात सर्वप्रथम संरक्षित कुळ येते. संरक्षित कुळ म्हणजे असे कुळ जे पूर्वीच्या जुन्या ‘कुळ कायदा सन 148’ चे कलम 14 अन्वये संरक्षित कुळ मानले गेले होते. सात-बारा उताराच्या इतर हक्कात संरक्षित कुळ म्हणून अशा व्यक्तीचा उल्लेख असेल, परंतु त्यासाठी हे कुळ 1939 च्या कुळ कायद्यानुसार दिनांक 1 जानेवारी 1938 पूर्वी सतत सहा वर्षे कूळ म्हणून कसत होता. तसेच एक जानेवारी पूर्वी सतत सहा वर्षे कुळ या नात्याने कसत असेल, आणि दिनांक 1 नोव्हेंबर 1947 रोजी कूळ म्हणून कसत असणाऱ्या व्यक्तीला संरक्षित कुळ असे मानले गेलेले आहे. हे देखील आपण उदाहरणाने समजून घेऊया. जर सुरेश 1 जानेवारी 1932 ते दिनांक 1 जानेवारी 1945 पर्यंत आणि त्याच प्रमाणे दिनांक 11 नोव्हेंबर 1947 रोजी कुळ या नात्याने जमीन कसत असेल तर त्यास संरक्षित कुळ मानले जाते.

नवीन Aadhar card आधार कार्ड डाऊनलोड करा आपल्या मोबाईलवर

कायम कूळ किंवा मिराशी कुळ : मुंबई कुळ वहिवाट कायदा 1948 कलम 2(10) अन्वये कायम कुळं म्हणजे, ”अशी व्यक्ती जी मुंबई कुळ वहिवाट सुधारणा कायदा 1955 उदयास येण्या-पूर्वीपर्यंत ज्या व्यक्तींना त्यांच्या वहीवाटी मुळे किंवा न्यायालय निकालामुळे कायम कुळ ठरवले गेले आहे.” हे देखील आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊन. सुधारित कायदा 1955 येण्यापूर्वी सुरेशने कुळ कायदा अव्वल कारकून तहसीलदार यांच्याकडे त्याची कुळ या नात्याने वहिवाट आहे आणि त्या प्रमाणे जमिनीला नाव लावण्यासाठी अर्ज दिला आणि ती चौकशी होऊन सुरेशची कूळ या नात्याने नाव लागले, तर असे कुळ कायम कूळ असे मानले जाईल.

MHT CET 2022 Result Date: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2022 च्या निकालाची तारीख जाहीर

बेदखल कुळ : बेदखल कुळ म्हणजे, ”कुळाने जर काही गोष्टींमध्ये किंवा नियमांमध्ये कसूर केलेला असेल तर अश्या व्यक्तिला कुळ या नात्याने बेदखल केले जाते आणि अशा कुळाला बेदखल कुळे असे म्हणतात.” आता कसूर म्हणजे काय हे का उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. सुरेश हा जमीन कुळ आहे, आणि जर सुरेशने महसूल वर्षाचा खंड त्या वर्षाच्या मे महिन्याच्या 31 तारखेपूर्वी जाणून-बुजून भरला नसेल, किंवा त्या जमिनीला जाणून बुजून काही कायमस्वरूपी नुकसान पोहोचविले असेल, किंवा जाणून बुजून कलम 27 चे उल्लंघन करून जमिनीची विभागणी किंवा हस्तांतरण केले असेल, किंवा अन्य कोणाला जमीन कसायला देत असेल, किंवा जमिनीचा वापर शेती शिवाय इतर प्रयोजना करिता करत असेल, तर अशा वेळेस जमीन मालकाने सुरेश ला तीन महिन्याच्या मुदतीत लेखी नोटीस द्यायचे असते. पुढे कुळ या नात्याने जमीन कसण्यास सुरेश अपात्र ठरतो आणि सुरेशला बेदखल कुळ असे म्हटले जाईल.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

मानीव कुळ :  याला इंग्लिश मध्ये Deemed Tenent असे म्हणतात. मानीव कुळ म्हणजे असे कुळ ज्याच्या वहिवाटी मुळे किंवा त्याच्या पूर्वजांच्या कुळवहिवाटी मुळे कुळ हे मानीव खरेदीदार होतात आणि अशा कुळाला मानीव कुळ असे म्हणले जाते.

पोट कुळ : आपण आपल्या लेखा मधील सर्वात शेवटचा आणि पाचवा पर्याय म्हणजे पोट कुळ. कायद्यान्वये पोट कुळ आणि पोट पट्टा यासाठी निर्बंध घातलेले आहेत. पोट कुळ म्हणजे असे कुळ की काही कारणा मुळे कुळाने पट्ट्याने त्याला ठेवलेले असते. असे पोट कुळ कुळाप्रमाणेच पट्ट्यांवर कुळाची जमीन कसतो. जर एखादी व्यक्ति अज्ञान असेल, किंवा अपंग असेल, किंवा सैन्यदलात नोकरीस असेल तर अश्या कुळाच्या जागी एखादी व्यक्ती जमीन कसत असेल तर तो पोट कुळ समजतात.

राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२२ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

House list : नवीन घरकुल यादी मध्ये आपले नाव पहा मोबाईलवर

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

Whatsapp group link

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending