September 22, 2024

अंधारी परिसरात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची मक्का पिके आडवी; हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता

0
Contact News Publisher

नुकसानभरपाई देण्याची शेतकर्यांची मागणी

  • क्राईम टाईम्स टीम
  • दिपक सिरसाठ

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची गावागावातून आमदार प्रशांत बंब यांनी मागवली माहिती

औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

CROP यादी : शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी 27 ते 36 हजार रुपये खात्यात जमा होणार : शासन निर्णय

अंधारी : यावर्षी वेळेत वरुणराजाच्या समाधानकारक हजेरीने तालुक्यातील शेतकरी सुखावला असला तरी रविवारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यात मका हे पीक वादळी वाऱ्याने आडवी झाल्याने या मोठे नुकसान झाले आहेत

सिल्लोड तालुक्यासह अंधारी परिसरातील जूनच्या सुरुवातीचा पाऊस पडला त्यावर शेतकऱ्यांनी मका कपाशी अद्रक आदी पिके लागवड केली.अधूनमधून पडलेल्या रिमझिम पावसावरच मका कपाशी आदी पिके तग धरून होती.त्यातच रविवारी (दि.चार) साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे मका ही पिके आडवी झाली अंधारी येथील शेतकरी काकासाहेब ध्रुपद उबळे यांची एक एकर मका तर तपोवन शिवारातील मंगेश भास्कर घरमोडे यांची दीड एकर मका अक्षरशा जमिनीवर झोपल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच पावसाने प्रदीर्घ उघडीप दिली तब्बल वीस दिवसांनंतर पावसाने रविवारी हजेरी लावली परंतु या पावसात वादळी वारे जास्त प्रमाणात असल्याने परिसरातील बरीचशी मक्का पिके आडवी झाली आहेत यामुळे हातातोंडाशी आलेला घास निघून जातो की काय यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.अशा अस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी पुरताच बेजार झाला आहे गेल्या पाच सहा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून मोठ्या पावसाची नितांत गरज आहे

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांत कंत्राटी पद्धतीने भरती; अर्ज मागविण्यात येत आहेत

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना 2022 माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2022 Form

अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शेतकरी मंगेश घडमोडे यांची दीड एकर मका तर काकासाहेब ध्रुपद उबाळे यांची एक एकर मका अक्षरशा आडवी झाली आहेत (छाया: दीपक सिरसाठ )

Poultry farming : जिल्हा परिषद योजना शेळीपालनासाठी 75 % तर कडबाकुट्टी साठी 50टक्के अनुदान वर अर्ज सुरु

 

औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

 

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending