December 4, 2024

नवरा माझी बायको नाटकाचे बहारदार सादरीकरण

0
Contact News Publisher

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शिव गणेश मंडळाच्या वतीने विघ्नहर्ता आर्ट्स नाट्य व सामाजिक बहुउद्देशीय संस्था भवन निर्मित राजेंद्र सपकाळ लिखित व दिग्दर्शित नवरा माझी बायको हा नाट्यप्रयोग बुधवार (दि.७) रोजी सादर झाला.

  • क्राईम टाईम्स टीम
  • दिपक सिरसाठ

मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद; अखेर आदेश निघालाचं..

या नाटकातील विनोदी प्रसंग, शाब्दिक कोट्या, कलाकारांचे अफलातून टाइमिंग आणि अभिनयामुळे नाट्यरसिक खळखळून हसले. टाळ्या शिट्यांनी मैदान दुमदुमले. नाटकात मराठी भाषेतील वैविधता व भाषेचा गोडवा दिसून आला. कलावंतांची खांदेशी, मराठवाडी, सोलापुरी, पुणेरी, वऱ्हाडी भाषेवरील पकड हे या नाटकाचे वैशिष्ट्य ठरले. या भाषेचा वापर करत कलावंतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. व्यसनमुक्ती तसेच आपल्या माणसांचा गुणदोषासह स्वीकार करावा. अशा विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. नाटकात श्रद्धा देवचक्के, रोशनी धोटे,पंकज सावंत, राजू आठवले,कडूबा गीते, जॉय भांबळ व राजेंद्र सपकाळ यांनी आपल्या अभिनयातून रसिकांची मने जिंकली.तंत्रज्ञ म्हणून विठ्ठल आहेर,योगेश कळम, तानाजी गाडेकर,मंगेश कळम, आकाश कुमावत, सचिन सपकाळ, यश चोरमले,आरेफ शेख,समाधान बोंद्रे,अनिल मोकासे यांनी काम पाहिले.

I LOVE YOU म्हण नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन; मजनूविरोधात गुन्हा दाखल: औरंगाबादेतील घटना

लाचखोर कृषी सहाय्यक ‘अडकला’ अँटिकरप्शनच्या जाळ्यात; कांदाचाळ अनुदान..

शिव गणेश मंडळ कार्यकारिणी व समस्त गावकरी मंडळ यांनी सहकार्य केले.
छायाचित्र ओळ

अंधारी :येथील शिव गणेश मंडळाच्या वतीने विघ्नहर्ता आर्ट्स नाट्य व सामाजिक बहुउद्देशीय संस्था भवन निर्मित राजेंद्र सपकाळ लिखित व दिग्दर्शित नवरा माझी बायको हा नाट्यप्रयोग बुधवार (दि.७) रोजी सादर झाला.
या नाटकातील विनोदी प्रसंग, शाब्दिक कोट्या, कलाकारांचे अफलातून टाइमिंग आणि अभिनयामुळे नाट्यरसिक खळखळून हसले. टाळ्या शिट्यांनी मैदान दुमदुमले

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending