बाजार सावंगी येथील नळकांडी पूल पुराणे उध्वस्त; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
बाजार सावंगी परिसरात मुसळधार पाऊस बरसल्याने बोडखी नदीला पूर येऊन पुराच्या पाण्याने या नदीवरील बाजार सावंगी- शिरोडी मार्गावरील नळकांडी पूल पूर्ण वाहून उध्वस्त झाल्याने रहदारी गैरसोईचे झाले आहे.
- बाजार सावंगी / विशाल नलावडे
हा पूल काही वर्षांपूर्वी श्रमदानातून बांधला होता मागील वर्षी पुराने वाहून गेला परंतु नागरिकांनी पुन्हा दुरुस्त केला होता या पुलावरून बाजार सावंगी येथील अनेक शेत वस्त्यांसह शेखपुर, ताजनापूर वस्ती, शिरोडी माय माऊली डोंगर पायथा शिवार असणाऱ्या शेतजमिनी धारकांची बारामाही रहदारी या रस्त्यावरून असते गावातील बरेचसे लोकांची शेत वस्तीवर आहे जड वाहनांची देखील रहदारी शेतमाल ने आन यासाठी होत असते त्यातच नळकांडी पूल पूर्णत वाहून गेल्याने रहदारीची गैरसोय झाली आहे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना शाळेला मुकावे लागत आहे. दूध ने आण व गावात येणाऱ्या जाणाऱ्यांंना सुद्धा पुलावरून जाणे धोक्याचे झाले आहे.
खुलताबाद येसगावं गिरजा मध्यम प्रकल्पमध्ये विजेने घेतला एकाचा बळी तर एक जखमी
Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022
या रस्त्यावरील शेत वस्तीवर माजी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य गावातील दुकानदार व्यावसायिक यांचेही वास्तव्य व घरे शेत वस्तीवर आहे त्यातच बराचसा रस्ता नदीच्या पात्रातून जातो गावालगत तीन नद्यांचा संगम व तीन दिशांना नळकांडी पूल त्यामुळे नेहमीच रहदारीची गैरसोय होते मागील महिन्यात चार ऑगस्टला याच नदीला आलेल्या पुरामुळे नळकांडी पुलावरून एक तरुण शेतकरी वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती आणि आता पुन्हा एक पूल उध्वस्त झाल्याने सर्वांची गैरसोय झाली आहे. तसेच निवडणुकीच्या वेळी पुढारी खूप मोठ मोठी आश्वासने देतात तर ते पुढारी आता झोपले की काय असा नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रहिवाशांच्या सोयीसाठी त्वरित कार्यवाही करावी नव्याने पूल उभारावा अशी या भागातील ग्रामस्थ व शेत वस्ती धारकांची मागणी आहे.
औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली पोलीस ठाणे उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून….
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा
बाजार सावंगी येथील नदीवरील नळकांडी पूल पुरा मुळे उध्वस्त झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे.