बाजार सावंगीच्या ‘त्या’ नळकांडी पुला’सह परिसरात पाहोचला अख्खा प्रशासन; खुलताबाद तहसीलदार यांचे कडक आदेश..
- प्रतिनिधी
- योगेश शेळके
- विशाल नलावडे
आज दि.12/09/2022 रोजी मा. तहसीलदार श्री.सुरेंद्र देशमुख यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात येऊ नये कोणत्याही ठिकाणी पावसामुळे नुकसान होत असेल तर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत तहसीलदार यांच्या सुचनेनुसार नायब तहसीलदार, श्री.सतिश देशमुख, मंडळ अधिकारी सतिश जोशी,तलाठी सायली विटेकर, सचिन भिंगारे यांच्या उपस्थितीत मौजे.बाजार सावंगी, ता.खुलताबाद येथील धाड नदीवरील वस्तीकडे जाणारा नळकांडी पुल दि.11/09/2022 रोजी झालेल्या पावसामुळे ढासळून वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. मा.नायब तहसीलदार यांनी उपस्थितांना सांगितले की संबंधित यंत्रणेला सुचना देऊन लवकरात लवकर काम मार्गी लागेल असे सांगितले.
Braking news -उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; सरन्यायाधीश रमण्णांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
ration card new : ‘रेशनकार्ड’ मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या ऑनलाईन
I LOVE YOU म्हण नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन; मजनूविरोधात गुन्हा दाखल: औरंगाबादेतील घटना
औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू