September 21, 2024

खुलताबाद पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची मोर्चेबांधणी; जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या सर्व जागा लढवणार

0
Contact News Publisher

वंचित बहुजन आघाडी पक्षाचा तिसऱ्या टप्प्यातील सत्ता संपादन मेळावा बाजार सावंगी सर्कल (बाजार गल्ली) येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

  • क्राईम टाईम्स टीम
  • नाविद शेख

आज दिनांक १४-०९-२०२२ गुरूवार रोजी खुलताबाद तालुक्यात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रेद्धय अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशावरून सत्ता संपादन मेळावा, बाजार सावंगी सर्कल मधील बाजार सावंगी येथे उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे,जिल्हा अध्यक्ष श्री. योगेशजी बन ( पश्चिम विभाग),व जिल्हा उपाध्यक्ष श्री.मिंलीद बोर्डे, सदस्य संघराज धम्मकिर्ती तर मेळाव्याचे अध्यक्ष श्री. मुक्तार भाई सय्यद हे होते.

खुलताबाद तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीचे 393 घरकुल मंजूर; प्रधानमंत्री आवास योजना सन-2021-22 मंजूर घरकुल यादी

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

सविस्तर माहिती अशी की, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक संदर्भात प्रमुख्याने वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार निवडून कसे येईल व त्यांना सत्तेत कसं जाता येईल व वेगवेगळ्या समस्या याच्यावर सर्वप्रथम सर्वांचे मनोगत ऐकून व चर्चा करून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे व्यक्तिमत्व म्हणजे वंचित बहुजन आघाडी पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे प्रतिपादन करुन लक्ष केंद्रित केले, जनतेचा व मतदारांचा कल व मोह आपल्याकडे कसा वळवता येईल याच्यावर सविस्तर तालुकाध्यक्ष श्री. मुक्तार भाई सय्यद व जिल्हाध्यक्ष श्री.योगेशजी बन यांनी आणि पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा सदस्य यांनी मार्गदर्शन केले. व वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये मराठा, मातंग, भिल्ल व इतर समाजाच्या कार्यकर्त्यांचा नवीन प्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी,गणेश तांदळे, मनोज कुचे, राजाराम घुसळे, अण्णा बनकर, राज बनकर, विजय जाधव, रवींद्र जाधव, तुकाराम जाधव, पुंडलिक गायकवाड, संजय आदमाने, कडूबा सोनवणे, विशाल जाधव ,आकाश साबळे, गौतम शेळके, रवींद्र खोतकर, अकबर शेख, सुरेश गायकवाड, सुरेश बनकर, अरुण गायकवाड, कलीम पठाण, सागर बनकर, विशाल जाधव, प्रवीण जाधव, अनिकेत बनकर, राजरत्न बोर्डे, प्रदीप बोर्डे, योगेश बोर्डे, नवनाथ वाघ, राजू पवार, त्रिशरण गरुड, शरद कोतकर, कान्हु झुराळे, सकाहारी जाधव, प्रकाश गायकवाड व सिराज शेख भाई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती बाजार सावंगी ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक अण्णाभाऊ व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खुलताबाद : संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी: 2022

औरंगाबाद : शेजारी, पतीच्या त्रासातून पोलीस आयुक्तालयात पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता होणार बंद; अखेर आदेश निघालाचं..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending