खुलताबाद तालुक्यातील सर्व तलाठी-मंडळाधिकरी कार्यलयला मिळणार हक्काची इमारत; प्रस्ताव मागविले

खुलताबाद तहसील कार्यलयकडून सर्व तलाठी मंडळाधिकरी यांना पाठवलेला पत्र
- क्राईम टाईम्स ब्युरो
- नाविद शेख
खुलताबाद तालुक्यातील काही गांवे वगळता उर्वरित सर्व तलाठी कार्यलय भाडेच्या खोलीत आहेत या सर्व कार्यलयाना स्वो:ताची इमारत मिळावी म्हणून अनेकवेळा चर्चा झाली होती मात्र अद्याप कार्यलय मिळाले नव्हते मात्र आता आमदार प्रशांत बंब यांनी गंभीरपणे दखल घेत इमारती बांधकाम करण्या संदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत तर संबधित तहसील प्रशासनाने तालुक्यातील सर्व तलाठी मंडळाधिकरी यांना पत्र पाठवून तलाठी कार्यलय-मंडळाधिकरी कार्यलय बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रस्ताव सादर करणयात यावे असे सूचित केले आहे.
तहसील कार्यलय कडून सर्व तलाठी मंडळाधिकरी यांना पाठवलेला पत्र
प्रति,
१) सर्व मंडळ अधिकारी
२) सर्व तलाठी सजा
ता. खुलताबाद.
विषय:- मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध असल्याची माहिती सादर करणे बाबत.
संदर्भ :- १) मा. आमदार श्री. प्रशांतजी बंब, विधानसभा सदस्य गंगापुर/ खुलताबाद यांची बैठक दिनांक
१५/०७/२०२२ रोजी झालेल्या बैठकीतील सुचनेनुसार.
२) या कार्यालयाचे पत्र क्रमांक २०२२ / जमा-२ / नविन प्रशासकीय इमारत/कावि- ३३२ दिनांक
०८/०८/२०२२.
उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक १ नुसार मा. आमदार श्री. प्रशांतजी बंब, विधानसभा सदस्य गंगापुर / खुलताबाद यांनी खुलताबाद येथे दिनांक १५/०७/२०२२ रोजी आढावा बैठक घेवुन मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधण्यासाठी दिलेल्या सुचनेनुसार खुलताबाद तालुक्यातील सर्व महसूल मंडळ विभाग व सर्व तलाठी सजा यांना शासकीय कार्यालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे माहिती सादर करणे बाबत या कार्यालयास कळविण्यात आले आहे.
विषयांकीत प्रकरणात संदर्भ क्रमांक २ नुसार सर्व मंडळ अधिकारी व सर्व तलाठी सजा येथे कार्यालय बांधकामासाठी किमान १५० चौ.मी शासकीय जागा उपलब्ध असल्याचे ७ / १२, ग्रामपंचायतचा नमुना ८ अ चा उतारा, ग्रामपंचायत ठराव, चतुः सिमासह टोच नकाशा व जागेचे हमीपत्र या कार्यालयास पाच दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रासह माहिती सादर करणे कळविले असता अद्याप पावेतो माहिती सादर केलेली नाही.
त्याअनुषंगाने आपणास पुन्हा सुचित करण्यात येते की, सर्व मंडळ अधिकारी व सर्व तलाठी सजा येथे कार्यालय बांधकामासाठी किमान १५० चौ.मी शासकीय जागा उपलब्ध असल्याचे ७/१२, ग्रामपंचायतचा नमुना ८ अ चा उतारा, ग्रामपंचायत ठराव, चतुः सिमासह टोच नकाशा व जागेचे हमीपत्र या कार्यालयास २ दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रासह माहिती सादर करण्यात यावी.
प्रतिलिपी,
तहसिलदार खुलताबाद
१) मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना आदरपुर्वक माहितीस्तव सविनय सादर. २) मा. श्री. प्रशांतजी बंब, विधानसभा सदस्य गंगापुर / खुलताबाद यांना आदरपूर्वक माहितीस्तव सविनय सादर.
cart तहसिलदार खुलताबाद