September 21, 2024

शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात;औरंगाबादमध्ये ‘मविआ’चं आंदोलन..

0
Contact News Publisher

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये आज महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी, काँग्रेस,शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांची पस्थिती पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्यावर हे आंदोलन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास आंदोलनाला सुरवात झाली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा

महाविकास आघाडीकडून आज औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विरोधीपक्षनेते अंबादास दानवे या आंदोलनाचे नेतृत्व करत असून, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे महत्वाच्या नेत्यांची सुद्धा यावेळी उपस्थिती पाहायला मिळत आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2022; अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

महाविकास आघाडीकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच बदलले आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय आंदोलन पोलिसांकडून गांभीर्याने घेतले जात आहे. त्यामुळेचा आजच्या आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

संकरित दुधाळ गाई /म्हशी चे वाटप योजना २०२२ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending