शेतीबरोबरच शेळी व कोंबडी पालनातून बसवली आर्थिक घडी
अंधारी : नेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा कोणताही पूरक व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. शेतीला जोड म्हणून केलेल्या शेळीपालन, कोंबडीपालन या व्यवसायातून सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण सुभाष पांडव यांनी आपल्या शेती आणि उत्पन्नाची घडी बसवली आहे. शेती सुपीक आणि शाश्वत करण्यासाठी त्यांचे शेळी व कोंबडीपालन अनेकार्थाने महत्त्वाचे ठरत आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांने शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली. शेळ्यांची निवड, योग्य खाद्य व्यवस्थापन, आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार बोकड आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. शेळीपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे.
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
अंधारी येथील लक्ष्मण सुभाष पांडव यांना एक एकर कोरड वाहु जमीन असून गेल्या पाच वर्षांपासूनच्या अधूनमधून पडत असलेल्या दुष्काळ नापिकीमुळे शेतमालातुन म्हणावं तसं उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता त्यात त्यांनी दोन वर्षांपूर्वी बँकेचे कर्ज काढुन तीन चाकी अपे गाडी खरेदी करून गावांत परिसरात मिळेल त्या भाडे तत्त्वावर चालवून कुटुंबाची उपजीविका भागवीत असताना परिसरात चार वर्षांपासून सतत दुष्काळ स्थिती निर्माण झाल्यामुळे हा व्यवसाय पुरताच मंदावल्याने कुटुंब चालवणे अवघड झाले.त्यामुळे त्यांनी आपल्याजवळील अपे विक्री करून अशा वेळी उत्पन्नासाठी काय करता येईल, याचा विचार करत असताना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला.परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून लक्ष्मण यांनी शेळीपालनास सन २०१४ मध्ये सुरवात केली. पांडव यांनी गावातील शेतकऱ्यांच्याकडून दोन शेळ्या विकत घेतली. यासाठी पाच हजार आठशे रुपये खर्च आला. सुरवातीला शेताच्या बांधावरील चारा,शेताजवळील डोंगरमाथ्यावर शेळ्यांना चारून संगोपन सुरू केले.शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी कळपात बोकड असला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. याच काळात त्यांनी गावातील एका शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपयांना एक बोकड खरेदी केला.बोकड कळपात आल्याने शेळ्या वेळेवर गाभण राहू लागल्या.चांगल्या बोकडामुळे पहिल्या टप्प्यात चांगल्या वजनाची करडे जन्माला येऊ लागली. आर्थिक उत्पनातही वाढ होऊ लागली
असे आहे शेळ्यांचे व्यवस्थापन
शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी दहा बाय चाळीस फुटांचा पूर्व-पश्चिम पत्र्याचा गोठा बांधलेला आहे.
गोठ्यात शेळ्यांना पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी मोठ्या आकाराची भांडी पाणी भरून ठेवली जातात. शेळ्या त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पितात. दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने भांडी भरली जातात.पांडव दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास शेळ्या आपल्या शेताजवळ असलेले डोंगर माथ्यावर चरावयास नेतात. शेळ्यांचे व्यवस्थापन स्वतःच व पत्नी अनिता या करतात.
शेळ्यांना पुरेसा चारा मिळावा यासाठी त्यांनी मका भरडून त्याचे दान तसेच भुस,सोयाबीन,हरभरा,तूर आदि पिकांचे भुस त्यातून आज त्यांच्याकडे असलेल्या चाळीस शेळ्यांची दररोजची खाद्याची गरज भागते. प्रत्येक शेळीस दररोज गरजेप्रमाणे दोन किलो हिरवा चारा दिला जातो, तसेच जंतनिर्मूलन केले जाते. करडांना पुरेसे दूध पाजले जाते.शेळ्यांमध्ये कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवली जाते. दोन महिन्यांतून एकदा शेळ्या धुतल्या जातात.गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये शेळ्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे पहिल्या टप्प्यात सात आणि पुढील सहा महिन्यांत आठ करडे गोठ्यात जन्मली.शेळीपालन व्यवसायासाठी पहिल्यांदा शेळ्यांची खरेदी, गोठा, खाद्य, पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा, औषधोपचार अशी तीस हजार रुपयांची गुंतवणूक झाली.
प्रशिक्षण : शेळीपालनाचा विचार आल्यानंतर त्याविषयीचे शास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी लक्ष्मण पांडव यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यांनी पत्नी अनिता बँक ऑफ महाराष्ट्र महाबँक ग्रामीण सह रोजगार प्रशिक्षण संस्था औरंगाबाद येथे महिला समूह साहाय्यता मार्फत शेतीपूरक उद्योगाच्या प्रशिक्षणात भाग घेतला.तिथे अनिता यांना डॉ. जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे आवश्यकतेनुसार त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे लक्ष्मण पांडव यांनी सांगितले
शेळी पालनाबरोबरच गोठ्यात दोनशेवर कोंबड्यांचे पालन
पन्नास बाय पन्नास चे शेळीपालनाचे शेड असून त्यामध्ये दहा बाय बावीस असे एकूण नऊ कप्पे तयार करण्यात आलेले असून शेडमध्येच दोनशे वर कोंबड्यांची पालन केलेले असून आता त्या कोंबड्यांपासून त्यांना दररोज पंचवीस ते तीस अंडी उत्पन्न मिळत असून उर्वरित राहिलेल्या कोंबड्यांपासून त्यांना अंड्याचे चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार आहेत त्यास प्रती अंडा दहा रुपये या दराने विकल्या जातात
शेळीपालन ठरले आर्थिकदृष्ट्या फायद्याचे…
गेल्या दीड वर्षातील शेळीपालनातील आर्थिक उत्पन्नाबाबत पांडव म्हणाले, की शेळीपालनाच्या पहिल्या टप्प्यात चार बोकडांच्या विक्रीतून 15 हजार उत्पन्न मिळाले मिळाले. चार बोकड दोन पाटींच्या शेळ्यांचा पाच महिन्यांचा चारा, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनाचा खर्च अधिक स्वतःची मजुरी असा एकूण दहा हजार खर्च झाला. यातून खर्च वजा जाता २५ हजार निव्वळ नफा झाला.दुसऱ्या टप्प्यात मागील महिन्यात सहा बोकडांच्या दोन कराडांच्या विक्रीतून १४००० रुपये मिळाले. या दुसऱ्या टप्प्यात शेळ्या आणि करडांचे व्यवस्थापन आणि स्वतःची मजुरी धरून १५ हजार रुपये इतका खर्च आला. खर्च वजा जाता २५००० रुपये नफा झाला. आता चारा स्वतःच्या शेतातील असल्याने व्यवस्थापन खर्च कमी होणार आहे. साधारणपणे सहा महिन्यांची करडे वजनावर विकली जातात. व्यापारी स्वतः गोठ्यावर येऊन करडांची खरेदी करतात.पांडव यांना दोन वर्षात खर्च वजा जाता करडांच्या विक्रीतून ऐंशी हजार रुपये आणि पाच ट्रॅक्टर ट्रॉली लेंडीखत विक्रीतून पंधरा हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे आज घडीला त्यांच्या गोठ्यात एकूण शेळ्यांची संख्या चाळीस असून त्यामध्ये ग्रेडिंगसाठी दोन बोकड १६ शेळ्यां नऊ पाठी तेरा बोकड सात एकूण लहान मोठ्या शेळ्यां ची संख्या चाळीस असून आता विक्रीस आलेल्या बावीस करडामधुन दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे
औरंगाबाद जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक शौचालय योजना सुरू; क्लिक करून अर्ज करा