वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाला आहे का अंत?; वृत्तपत्र विक्रेता दिन १५ ऑक्टोबर
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
अंधारी : धावपळीच्या जगात वृत्तपत्रांचं अस्तित्व आजही तितकंच महत्वाचं मानलं जातंय.काळाने सद्यपरिस्थितीत त्याच्यापुढे बरीच आव्हाने उभी केली असली तरी,आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यात वृत्तपत्रांना जे आज यश मिळतय,त्यात महत्वाची भुमिका जर कुणी बजावत असेल तर तो म्हणजे वृत्तपत्र विक्रेता.सकाळी पहाटे साखरझोप विसरुन भुकेल्या पोटी,फक्त चहावर अर्ध्या झोपेतही आपले काम चोखपणे बजावणारे वृत्तपत्र विक्रेते आजही काही कमी नाहीयेत.येणा-या वर्तमानपत्रांची वर्गवारी करुन ती विभागुन ज्याच्यात्याच्याकडे वेळच्यावेळी अत्यंत कमी वेळात पोहचवणं,हे एकाग्रतेचं काम खरं तर तेच करु जाणोत.त्यातही एखाद्या प्रकाशनाची गाडी उशिरा आली तर पुन्हा डबल काम.
१५ ऑक्टोबर हा दिवस म्हणजे राष्ट्रपती डाॅ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस.हा दिवस शासनातर्फे वाचन प्रेरणा दिवस म्हणुनही साजरा केला जातो.ज्या महापुरुषाने लहान असताना गरजेपोटी वृत्तपत्र वाटप केले,त्यांच्याच जन्मदिनी वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा होण्यास सुरुवात झाली,ही गोष्टचं स्वागतार्ह आहे,जबाबदारीची जाणीव करुन देणारी आहे.
वृत्तपत्र विक्रेता ही गोष्ट खरंतर अभ्यासाशिवाय समजु न शकणारी आहे.विविध वृत्तपत्र संघटनांद्वारे विक्रेत्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांसाठी त्यावर नेहमीच अभ्यासू पद्धतीने चर्चा व उपक्रम आयोजिले जातात.आज आधुनिक काळी जसे संदेश बदलले तशी ती नेणारी साधनेही बदलु लागलीयेत.डिजीटलायझेशनच्या युगातही आपले महत्व वृत्तपत्रांनी अधोरेखित केलंय.आज उद्योगांस चालना देण्यासाठी,शिक्षणाची माहिती व प्रसिध्दीपत्रकाकरता,संस्कारक्षम लेखांकरता,राजकारण कट्टा,अर्थनीती समजावणारी वृत्तपत्रे,समाजकारणासाठीचं एक माध्यम म्हणुन वृत्तपत्रांचं साम्राज्य आजही तितकंच अबाधित आहे. वर्तमानपत्रांना आजघडीस चांगल्यात चांगले तंत्रज्ञान वापरून छापावी तर लागतातच, पण त्याही पेक्षा ती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शारीरिक मेहनत ही घ्यावीच लागते.इंटरनेटचं जाळ जरी घरोघर व हातोहात पोहचलं असलं तरी हातात वृत्तपत्र घेऊन वाचणं म्हणजे वाचकांसाठी स्वर्गसुखच.
वर्तमानपत्र छापुन झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात साधारण ४ तासांच्या आत ते विक्रेत्यांकडे पोहचवणे गरजेचे असते, नाही तर त्याची रद्दी होते ,हे माहित असल्यामुळेच चांगल्या प्रकारचे वितरण आणि त्यासाठी चांगले वितरक कंपनीला नेमावे लागतात.सकाळी पहाटेच उठून ती विविध भाषांची ,विविध किमतींना असणारी ,विविध वितरकांकडे असणारी वर्तमान पत्रे विक्रेत्यास अत्यंत कमी वेळात जागच्या जागेवर पैसे मोजून खरेदी करावी लागतात.त्यामुळे चलाखपणा ,हिशोबी वृत्ती,एकाग्रता,चाणाक्षपणा हा नित्याचाच असतो.तो ही पहाटेच म्हणजे अपुरी झोप राहिली तर गणित चुकलं समजायचं;हिशोबाचंही आणि आरोग्याचही,ही धावाधाव करून घेतलेली वर्तमानपत्रे वेळच्या वेळेस वाचक असलेल्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक इमारतीगणिक आणि घरांगागणिक वेगवेगळी टाकावी लागतात ,त्यातही मोठी कसरत ज्याला जो पेपर हवा तो त्यालाच मिळावयास हवा .एखाद्या कन्नड वाचणाऱ्याला तेलगु देऊन कस चालेल? एखादं राजकीय पक्षप्रेरित वर्तमानपत्र असेल तर दुसरे देऊन कसे चालेल ?आणि समजा चुकून गेलीच तर भांडणे
नित्याचीच ,त्यामुळे भांडणाकडे फारसे लक्ष न देता एकाग्र होऊन शांतपणे काम करणे आलेच ,शारीरिक मेहनती सोबत, मानसिक परिश्रम आणि बौद्धिक स्थिरता आलीच,त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्कृतीतल्या माणसांशी जुळवून घेण्याचा व्यवहार कुशलपणा आलाच.हे सर्व पहाटेच करायचे म्हणजे उपाशीपोटीच!! कमालीची थंडी असो ,पाऊस असो,वा दुपारचे कडक ऊन असो, येथे परिश्रमाला पर्यायच नाही.लोक कितीही म्हणोत इंटरनेटचा युग आलंय वाचकवर्ग घटतोय, पण वास्तव परिस्थिती झुगारून देऊन चालणार नाही दिवसाला लाखोंगणिक वाचकवर्ग सद्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांना भेटतोय विविध कंपन्यांना ,शासनाला राजकीय पक्षांना ,सामाजिक कार्यकर्त्यांना,संस्कृति रक्षकांना व्यापक स्तरावर एखाद्या गोष्टीची जाहीरात/ माहिती देण्यासाठी साधन मिळतंय हे खरं !! याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल,
विक्रेत्यांना आपण इतक्या व्यापक संकल्पनेशी जोडले गेलेलो आहोत, याची स्पष्ट कल्पना फारच कमी जणांना आहे.केवळ किमतीच्याच खेळात,वा जाणीवेत खेळत राहिलेला सद्याचा विक्रेतावर्ग आपणास दृष्टीस पडतो ,किमतीसोबत सामाजिकतेचंही भान काही अंशाने तरी वाढलय का ? हा प्रश्न अन्नुत्तरितच राहतो .कारण फक्त एकच तशी कल्पना व भान देणे हे समाजाने तरी नाकारलंय किंवा वर्तमानपत्रांच्या कंपन्यांनी ?म्हणूनच ह्या व्यवसायाची प्रतिष्ठा दिवसेंदिवस खालावताना दिसतेय ,म्हणूनच “पेपर विक्रेता”म्हणवून घेणं हे बहुतेक जणांना उपेक्षितच वाटतं,जणू काय एखादी जातच!! म्हणूनच पेपर विक्रेत्यांची मुले भले ह्या व्यवसायात कमाई असो तरी ते तो व्यवसाय करताना दिसत नाही.हल्ली प्रत्येक वर्तमानपत्र हे स्वतःकिती श्रेष्ट आहे हे दाखविण्यासाठी स्पर्धात्मक दृष्टीकोन ठेवते.परिणामी किमतीच्या पद्धतीत ,विक्रेत्यांच्या विक्रीतही स्पर्धा उभी राहू लागली आहे .पण तरीही विक्रेत्यांना मेहनत ही घ्यावीच लागते.त्यांची हीच मेहनत त्यांना आयुष्यात खुप काही देऊन जाते.उत्सवाच्या काळात ठराविक वेळेसच वर्षातून ४ वेळेसच ह्या विक्रेत्यांना सुट्टी असते .गणेशोस्तव ,होळी ,२६ जानेवारी ,दिवाळी बाकी १२ ही महिने सदोदित जळत/भिजत/कुडकुडत राहून वाचकांची भूक मिटवण्याची जबाबदारी समर्थपणे पेलणा-या विक्रेत्यांना मनापासुन सलाम!प्रिंट मिडियाची घसरण,अर्थनियोजन,छपाई महंगाई,अनुदान,जाहिराती,विक्रेत्यांचे प्रश्न असे कैक प्रश्न आज उभे राहिलेत.आज ह्यात सर्वाधिक महत्वाचा कुठला जर प्रश्न असेल,तर तो वृत्तपत्र विक्रेत्यांचा.वर्षानुवर्षे वर उल्लेखलेली मेहनत करूनही वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वत:च्या हक्काची जागा तर नाहीच, पण साधी नोंदणी पण नाही.खालावत चाललेल्या व्यवसायाला हे एक कारण आहे.त्याच कारणामुळे नवपिढीचे ह्याकडे दुर्लक्ष होतय.दिलीप पाटील ,जगदीश पाटील, ओकार खोंडे वैगेरे अशा नामवंत व्यक्तीनां हा व्यवसाय करूनच त्यांना प्रगतीच्या दिशा भेटल्या.आज जरी संदेशवहन मोबाईल-इंटरनेटमुळे वाढले असले तरी हा व्यवसाय टिकावा,वाढावा,बहरावा अशी अपेक्षा समाजस्तरातून व्यक्त होतेय,त्यासाठी स्वतंत्र महामंडळ करून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी,अनुदान,पाल्य शिक्षण,आरोग्यविषयक सुविधा,राखीव घरे तत्सम प्रश्न मिटावेत,म्हणून सरकारदरबारी घाट घातला जातोय,तो मार्गी लागावा,ही अपेक्षा…..
पुनश्च वृत्तपत्र विक्रेता दिवसाच्या व वाचन प्रेरणा दिवसाच्या