September 22, 2024

कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

0
Contact News Publisher

खुलताबाद – येथील कोहिनूर कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. मजहर खान साहेब व कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव मा . श्रीमती आस्मा खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ . ए . पी . जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला .

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रफीऊल्लाह खान सर होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. महानंदा चंद्रकांत दळवी व डॉ. दिपाली जोशी उपस्थित होत्या. यावेळी व्यासपिठावर डॉ. शेख आरेफ मोहम्मद उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या डॉ. महानंदा दळवी यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. सारिका रेनगुंठवार यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. मनिषा वंजारी यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बलवान पाटील यांनी तर आभार डॉ. रमेश देवडे यांनी मानले. सदरील वाचन प्रेरणा दिना निमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने उत्कृष्ट वाचक शिक्षक आणि विद्यार्थी यांची निवड करून त्यांना पारितोषीक देण्यात आले . त्यामध्ये उत्कृष्ट वाचक शिक्षकामध्ये डॉ. ईश्वर घोरूडे व डॉ. आफ्रिन रेहमान यांना तर विद्यार्थ्यानं मधून पठाण रमिजा फिरोज खान, शेख जेनुलाबेदन , आकांक्षा शेलार व नाडे प्रेरणा या विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी ग्रंथालयं विभागात पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending