September 21, 2024

खुलताबाद तालुक्यातील वढोद कान्होबा येथून गाय चोरीला

0
Contact News Publisher
  • सुलतानपुर ,प्रतिनिधी
  • अतुल सरोदे

खुलताबाद : तालुक्यातील वढोद कान्होबा येथील पशुपालक बाबासाहेब कडूबा चव्हाण यांच्या गट ८०/४अ शेतातील गोठ्यात बांधलेली सुमारे तिस हजार रुपयांची एक गावरान गाय, दिनांक शनिवारी २९ रोजी रात्री दोन च्या सुमारास शेतामधून चोरीला गेले. ,सकाळी सहा वाजेच्या सुमारास पशुपालक नेहमी प्रमाणे चारा.टाकण्यासाठी गेले असता गाय गोठ्यात दिसली नाही. गाय सुटुन गेली कि काय म्हणून परिसरात शोध घेतला असता ,गायीचा. तपास लागला नसल्यामुळे गाय चोरी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान
गाय चोरीच्या संदर्भात बाजार सांवगी पोलीस चौकी मध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending