September 21, 2024

कृषीमंत्रीच्या तालुक्यातील अंधारी गांव अंधारात!; तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष

0
Contact News Publisher

विज कंपनीने जास्त विजेचे नवीन ट्रान्सफार्मर जोडल्यास कायमस्वरुपी ही समस्या मिटेल.

  • क्राईम टाईम्स प्रतिनिधी
  • दिपक सिरसाठ

अंधार:सिल्लोड तालुक्यातील
अंधारी गांवाला विद्युत पुरवठा करणारे विद्युत रोहीत्र सातत्याने जळत असल्यामुळे नागरिकांच्या
मुलभुत गरजा थांबल्या आहे व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमधे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

□ अंधारीला विद्युत पुरवठा करणारी अकरा रोहीत्र आहेत.सर्वच रोहीत्र जुनी अथवा जीर्ण अवस्थेत आहे. वीजेचा रोहीत्रांवर असलेला असमान दवाब वाढत जात असल्यामुळे रोहीत्र जळण्याचे नित्याचे प्रकार होत आहे.परिणाणस्वरुपी दिवाळीचा सण सुध्दा आर्ध्या गांवाला अंधारातच साजरा करावा लागला.

□ गांवातील एक-दोन रोहीत्र जळाली की वीज कंपनी द्वारे नविन बसविले जातात.परंतु वीजेचा असमान दाब वाढत गेल्याने पुन्हा जुनी रोहीत्र जळतात.ह्या सर्व प्रकारामुळे गांवातील अधिकांश भाग अंधारातच राहतो.

*□ वीज कंपनी कडे एकाच वेळी सर्व रोहीत्र बदलून जादा केव्हीचे रोहीत्र बसवून वीजेचा समान दवाब वर्गीकत करण्याच्या गावकऱ्यांच्या मागणीकडे महावितरण कंपनीकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे*

विज वितरण कंपनीकडुन तात्काळ कार्यवाही करुन दखल घेऊन गावांतील रोहित्राच्या समस्येचे निराकरण न झाल्यास *गांवातील नागरिकांसह विज कंपनीसमोर ठिय्या मारुन आंदोलन करण्याची बाब ग्रामपंचायत सदस्य खालेद पटेल यांनी निदर्शनास आणून दिली*

□जुनी व जास्त विजेचा दाब वाढत जात असल्याने अकरा पैकी कधी कोणती रोहीत्र जळतील याचा भरोसा नसल्याने गांवातील कोणत्या प्रभागात अदलून-बदलून अंधार पडु शकतो,अशा अंधाराच्या भितीच्या सावटाखाली ग्रामस्थ संभ्रमात जगत आहेत.त्यामुळे गांवातील पिठाच्या गिरण्या व शेतकऱ्याच्या मोटारी, पिण्याचे पाणी,दैनंदिन व्यवहार आदीचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.विज कंपनीच्या अधिका-यांना कळवूनही उडवा उडवीचे उतर देऊन दुर्लक्ष केले जात आहे.

□ किमान ग्रामपंचायत सदस्य खालेद पटेल यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलनाला सामोरे जाण्यापूर्वी महावितरण कंपनी लक्ष देवून गांवाला प्रकाशमय करेल अशी आशा ही ग्रामस्थ बाळगून आहे.
छाया दीपक सिरसाठ

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending