September 21, 2024

औरंगाबाद : वैजापूर शहरातील चारचाकीच्या शोरूमला भीषण आग

0
Contact News Publisher

औरंगाबाद जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून, वैजापूर शहरातील एका चारचाकीच्या शोरूमला भीषण आग लागली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले जात आहे. घटनास्थळी वैजापूर पोलीस दाखल झाले असून, नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तर याबाबत अग्निशमन दलाला देखील माहिती देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

दुचाकी शोरूमला आग लागल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. तर शोरूमला लागेलेली आग विझवण्यासाठी उपस्थित नागरिक प्रयत्न करत आहे. विक्रीसाठी शोरूममध्ये नवीन पा-सहा गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयन्त केले जात आहे. मात्र आग एवढी भीषण आहे की, शोरूममधील सर्वच वस्तू जळून खाक झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

औरंगाबाद-‘साहेब रोजची कटकट संपवली!’; पत्नीची हत्या करून पती थेट पोहचला पोलीस ठाण्यात

मेहुणीला ब्लॅकमेल करून नग्न व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडणारा अटकेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending