September 21, 2024

औरंगाबाद: शाळेतील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यासह पालकांना मारहाण; धक्कादायक कारण समोर

0
Contact News Publisher

औरंगाबाद सिल्लोड येथे शाळेची फी भरण्याच्या कारणावरुन विद्यार्थी आणि पालकाला मारहाण करण्यात आली आहे. संस्थाचालकाच्या मुलासह कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केली आहे. सिल्लोडमधील लिटल वंडर्स इंग्लिश स्कूलमध्ये हा प्रकार घडला. यात एका दहावीच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक फी भरण्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला त्याच्या पालकासह धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मेहुणीला ब्लॅकमेल करून नग्न व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडणारा अटकेत

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सुरज शिरसाट या दहावीच्या विद्यार्थ्याला तीन दिवसापासून वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं. मुलाने हे आपल्या वडिलांना सांगताच वडिलांनी शाळेत जाऊन जाब विचारला. यावर मुलाची फी भरली नसल्यामुळे आम्ही त्याला बाहेर बसवतो, असं शाळा प्रशासनानं सांगितलं.त्यावर वडील भगवान शिरसाठ यांनी सांगितलं की, मी आजही फी भरायला तयार आहे. या अगोदरही तीन वेळा येऊन गेलो. मात्र शाळेच्या प्रशासनाने फी स्वीकारली नाही, असं त्यांनी सांगितलं. मात्र संस्थाचालकाच्या मुलासह दोन कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचा दाखलाच हातात दिला. इतकंच नाही तर त्यांनी विद्यार्थी आणि पालकाला धक्काबुक्कीही केली.

कोणतंही कारण नसताना त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यासोबतच तुमच्या मुलाचं भविष्य खराब करू, अशी धमकीही या पालकाला दिली गेली. याप्रकरणी वडील भगवान शिरसाट यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात संस्थाचालकाच्या मुलासह दोन जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending