September 21, 2024

औरंगाबाद : नव्या मीटरसाठी १६ हजारांची लाच; महावितरण कर्मचारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात

0
Contact News Publisher

प्लॉटवर नवीन वीज मीटर बसविण्यासाठी १६ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ साहेबराव बाबाराव घुगे (वय ३२, रा. रो. हा. क्र डी-२, श्रीकृष्ण रेसिडेन्सी, पिसादेवी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाते यांच्या प्लॉटवर शेडचे बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी नवीन वीज मीटर बसविण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता.

महावितरणाकडे रितसर अर्ज भरून त्यांना वीज मीटर मिळत नव्हता. महावितरण उपविभाग ग्रामीण क्रमांक १ हर्सूल सावंगी येथे वीज मीटर का मिळत नाही याबाबत त्यांनी अधिक चौकशी केली असता, वीज मीटर बसविण्यासाठी या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ साहेबराव घुगे याने १६ हजार २०० रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी केली.
त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारदात्याकडे संबंधीत ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्याने लाच मागितल्याच्या प्रकरणाची शहनिशा केली.

या शहनिशा केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचून तक्रारदार याच्याकडून वीज मीटर बसविण्यासाठी साहेबराव घुगे याने १६ हजार २०० रुपयांची लाच घेत असताना पिसादेवी भागातून घुगे यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सुनिल पाटील, केवलसिंग घुसिंगे, दत्ता होरकटे यांनी केली.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending