September 21, 2024

औरंगाबाद: एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर; प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना; सुदैवाने..

0
Contact News Publisher

औरंगाबादच्या लासूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला. नेमकं काय घडतय कोणालच काही कळत नव्हते. मात्र रेल्वे स्थानक आल्याने अगोदरच कमी स्पीड असलेल्या रेल्वे चालकाने गाडी थांबविली आणि मोठा अनर्थ टळला. आता यात कोणाची चुकी होती याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

मित्राला आधी दारू पाजली, जेऊ घातले नंतर केली हत्या: औरंगाबाद

औरंगाबाद : नव्या मीटरसाठी १६ हजारांची लाच; महावितरण कर्मचारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात

त्याचं झालं असे की, शुक्रवारी रात्री सव्वासातच्या सुमारास जालना नगरसूल डेमो पॅसेंजर (07492) दोन नंबरच्या ट्रॅकवर जाण्याऐवजी एक नंबर प्लॅटफॉर्मवर आली. मात्र, त्या अगोदर समोरून त्याच प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्याच विद्युतीकरण कामाची स्पेशल दोन डब्यांची रेल्वेगाडी उभी होती. दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर आल्याने काही वेळेसाठी गोंधळ उडाला. दरवाज्यात उभे असलेल्या प्रवाशांना समोर उभी असलेली रेल्वे दिसल्याने त्यांच्या काळजाचा ठोका उडाला.

खाद्यतेलाचे टँकर उलटले अन् उडाली एकच झुंबड डबे अन् ; पातेले भरभरून नेले फुकटचे तेल

काय होतेय कोणालाच कळत नव्हते. मात्र रेल्वे स्थानक आल्याने अगोदरच कमी स्पीड असलेल्या डेमोच्या पॅसेंजरच्या चालकाने गाडी थांबविली. त्यामुळे गाडी थांबली मात्र दोन्ही रेल्वे गाड्यांत अवघे दोन ते तीन फुटाचे अंतर उरले होते. त्यानंतर रेल्वेने डेमो पॅसेंजरला पुन्हा मागे घेऊन दोन नंबर ट्रॅकवर आणले. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही.

 

औरंगाबाद-‘साहेब रोजची कटकट संपवली!’; पत्नीची हत्या करून पती थेट पोहचला पोलीस ठाण्यात

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending