September 21, 2024

‘लुटेरी दुल्हन’सह तिच्या साथीदारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, जातही खोटी सांगितली

0
Contact News Publisher

बनावट लग्न लावुन नवरदेवाला व त्यांच्या कुटुंबाला लुटणाच्या टोळीचा औरंगाबाद ग्रामीणच्या पैठण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, लुटेरी दुल्हनसह तिच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे एका तरुणाची होणारी मोठी फसवणूक टळली असून, त्याचे दीड लाख रुपये देखील वाचले आहे.

आंबादास नवनाथ नागरे (रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अहमदनगर, ह.मु.नारळा, पैठण ता. पैठण), राजु अंकुश चाबुकस्वार (वय 39 वर्षे रा. चन्नापुरी ता. अंबड जि.जालना) उमेश गणेश गिरी (वय 22 वर्षे रा. तिर्थापुरी ता. घनसांवगी जि. जालना) शिला मनोहर बनकर (वय 35 वर्षे रा. एकतुनी ता.पैठण जि.औरंगाबाद) असे आरोपींचे नावं आहेत.
पैठण परीसरात बनावट लग्नाच्या घटना वाढल्या असल्याने पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत सुचना करत या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पैठण पोलिसांकडून या टोळीचा शोध घेतला जात होता.

दरम्यान शनिवारी सायंकाळी 05.30 वाजेच्या सुमारास नाथ मंदिर पार्किंग परीसरात काही संशयीत व्यक्ती लग्नाचा बनाव करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत वधु व वराच्या वेषात असलेल्या व्यक्तींची विचारपुस केली. मात्र यावेळी वधु पक्षाकडील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांमुळे पैठण पोलीसांचा सदर लग्नाबाबत संशय वाढल्याने वधु पक्ष व वर पक्षातील लोकांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending