September 21, 2024

वानरास घाबरून हौदात पडल्याने दोन वर्षे मुलीचा अंधारीत मृत्यू

0
Contact News Publisher
  • दिपक सिरसाठ

अंधारी: सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शेतकरी शिवाजी साहेबराव तायडे यांची मुलगी घरासमोर खेळत असताना अचानक वानर आल्याने घाबरून  पळाल्याने राहत्या घरासमोरील हौदात पडल्याने मृत्यू झाला ही घटना गुरुवारी ( दि. साडेपाचच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की शेतकरी शिवाजी तायडे यांची मुलगी अंधारी येथील पवारी शिवाजीची त्यांच्या राहत्या घरासमोर तिच्या मित्रासोबत सोबत खेळत होती. अचानक वीस ते पंचवीस वानरांची टोळके धावत आल्याने सर्व मुले घाबरली सर्व मुले आपापल्या परीने घाबरून पळू लागले परंतु श्रेया पळत असताना घरासमोरील असलेल्या हौदात पडली. थोड्या वेळानंतर घरातील व आजूबाजूचे मुले आली परंतु श्रेया का बरं नाही. यासाठी तिची सर्वत्र शोधा शोध केली असता केली असता घरासमोरील हौदात ती पडलेली आढळून आली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या मागे आई-वडील आजी आजोबा  आत्या एक बहीण असा परिवार आहेत

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending