अंधारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाण्याअभावी स्वच्छतागृहाची दुरावस्था
एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येच्या शाळेसाठी एकही शिपाई नाही : तीन शिपाई पद रिक्त
- दीपक सिरसाठ
अंधारी : प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ व निर्मल भारत अभियान राबविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र योग्य नियोजनाअभावी त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे ही मोहीम केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहे. याचे उदाहरण म्हणजे सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीत पहावयास मिळते. या शाळेत प्रशासनाने स्वच्छतागृहाचे बांधकाम तर केले, मात्र पाण्याची योग्य सोय केली नसल्याने हे प्रसाधनगृह आज निकामी ठरू पाहत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणार्या या शाळेत स्वच्छतागृहे करण्यात आली आहेत.
औरंगाबाद: गावठी कट्ट्यातून गोळीबार;पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मात्र योग्य देखभालीअभावी येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून शौचालयातील पाईप, पाण्याची टाकी शोभेची बाहुली म्हणून उभी आहेत तर इतर साहित्य तुटले आहे. या शाळांमधील स्वच्छतागृहे वापरण्यास योग्य नसल्याने शाळेतील मुलांना उघड्यावर लघुशंका व शौचास जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंधारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात एकूण विद्यार्थी संख्या 726 एवढे विद्यार्थी शिक्षण घेतात. एवढी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असूनही सद्यस्थिती एकही शिपाई नसून गेल्या तीन ते चार वर्षांपासून तीन शिपाई पद रिक्त आहेत शिवाय शाळेच्या सुरत शेतीसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे ही अज्ञात व्यक्तीने लंपास केले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचा लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला असून पाण्याअभावी तोही शोभेची बाहुली बनलेला आहेत यामुळे येथे मूलभूत सुविधांच्या नावाखाली बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे पूर्णपणे घाणीच्या विळख्यात सापडलेल्या अवस्थेत पोहोचली असून, ती वापरण्यास योग्य नाहीत. शाळेत काही महिन्यांपूर्वी शौचालय बांधण्यात आले, मात्र येथेही योग्य देखभालीअभावी स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. शाळेच्या वर्ग खोल्यांचे जागोजागी खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत एकीकडे शिक्षण विभाग जिप शाळांचे डिजिटल शाळेत रूपांतर करण्याचा दावा करते तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे.
अनेक शाळांमध्ये डिजिटल शिक्षण तर दूर, डिजिटल शिक्षणासाठी लावण्यात आलेले संसाधनही बंद पडल्याचे चित्र आहे. अनेक जिल्हा परिषद शाळांची प्रसाधनगृहे आज केरकचरा व घाणीने बरबटले आहेत. कित्येक शाळांमधील प्रसाधनगृहांमध्ये पाणी व अन्य सामग्रीचा अभाव दिसून येतो. आज जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे. या सुविधा जिपच्या शाळांमध्ये मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या कलही खाजगी शाळांकडे दिसून येतो. परिणामी दिवसेंदिवस या शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत असल्याचे चित्र आहे. अनेक गरीब पालक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी इच्छा नसतानाही खाजगी शाळांमध्ये शिकवीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शासकीय शाळांकडे लक्ष देऊन मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज पालकांंतर्फे व्यक्त होत आहे.
समृद्धी महामार्गावर एका चार चाकीला भिषण आग;सुदैवाने चालक आणि प्रवासी सुरक्षित
अंधारी येथील जिल्हा जिल्हा परिषद प्रशालेत असलेल्या स्वच्छता याची पाण्या अभावी झालेली दुरवस्था ( दुसऱ्या छायाचित्रात ) साठी वापरण्यात येणारी टाकी पाण्याअभावी शोभेची बाहुली बनवून उभी आहे (तिसऱ्या छायाचित्रात) शाळेच्या शाळेच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात व्यक्तीने लंपास केले आहेत ( चौथ्या छायाचित्रात ) शौचालयाच्या सेफ्टी टॅंक च्या पाईपची झालेली दुरावस्था ( पाचव्या छायाचित्रात ) हजारो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचा हौद शोभेशी भावली बनली आहेत (सर्व छायाचित्रे दीपक सिरसाठ )
‘लुटेरी दुल्हन’सह तिच्या साथीदारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, जातही खोटी सांगितली